E- Scooter : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी लोकांना प्रवास करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत. मात्र यातून आता एक मार्ग निघाला आहे. यामुळे आता तुम्हाला प्रवासादरम्यान अधिक पैश्याची गरज भासणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल व डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य लोक खूप चिंतेत आहेत. मात्र आता त्यांची चिंता कमी करण्यासाठी दुचाकी उत्पादक भारतीय बाजारपेठेत स्वस्त आणि कमी इंधनात जास्त धावणाऱ्या स्कूटर बनवत आहेत.
ही ई-स्कूटर केवळ 5 रुपयांमध्ये 50 किलोमीटर धावते
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचा दावा आहे की ही ई-स्कूटर केवळ 5 रुपयांमध्ये 50 किलोमीटर चालते. यामध्ये 250 W चा मोटर बसवण्यात आला आहे. त्याची बॅटरी 1kW/48V ची आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतात. तसेच ते चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही.
मालाची ने-आण करण्यासाठी बनवलेली हेवी ड्युटी
ही माल वाहून नेण्यासाठी हे विशेष हेवी ड्युटी बनवले जाते. ही इंगो फ्ली एका पूर्ण चार्जमध्ये 55 किमी पर्यंत धावते. तसेच त्याचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. आणि त्याचे फ्रंट सस्पेंशन 43mm टेलिस्कोपिक आहे.
75 किलो वजन सहज वाहून नेऊ शकते
ही एक शक्तिशाली स्कूटर आहे. ही स्कूटर 65 Nm पीक टॉर्क जनरेट करते म्हणजे जड सामान सहज वाहून नेऊ शकते. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर पुढील बाजूस जास्तीत जास्त 50 किलो आणि मागील बाजूस 25 किलोपर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. तसेच ब्लॅक InGo Flee Basic सुमारे 59,000 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.