Budget Impact On Daily Items : भारतात 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात या नवीन वर्षात पहिल्याच दिवसापासून काही बदल पाहायला मिळणार आहे. यामुळे तुमच्या खिशावरचा भारही वाढू शकतो.
देशात 1 एप्रिल 2023 पासून अनेक वस्तूंच्या किमती बदलणार आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी काही उत्पादनांवर कर लादला होता आणि काहींवर तो वाढवला होता ज्याचा परिणाम आता 1 एप्रिलपासून दिसून येणार आहे. चला मग जाणून घ्या देशात 1 एप्रिल 2023 पासून कोणत्या वस्तू महाग होणार आहे आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहे.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी काही उत्पादने महाग केली आहेत तर काहींवरील करही कमी केला आहे. 1 एप्रिलपासून कॅमेरा लेन्स तसेच स्मार्टफोन सारख्या वस्तू स्वस्त होतील, इलेक्ट्रिक किचन चिमनी, सोने आणि प्लॅटिनमच्या वस्तूंच्या किमती वाढतील, किचन चिमणीवरील कस्टम ड्युटी 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आली आहे.
काय स्वस्त होईल
1 एप्रिल 2023 पासून अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टींची किंमत कमी होईल. यामध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हीट कॉइल, हिऱ्यांचे दागिने, बायोगॅसशी संबंधित वस्तू, सायकल इत्यादींचा समावेश आहे.
या गोष्टी महाग होतील
स्वयंपाक घरातील इलेक्ट्रिक फायरप्लेस
आयात केलेल्या वस्तू
सिगारेट
सोन्याचे दागिने आणि वस्तू
प्लॅटिनम
चांदीची भांडी
हे पण वाचा :- Weather Update : बाबो .. ‘या’ राज्यात पुन्हा गारांचा पाऊस ! IMD ने जारी केला अलर्ट ; वाचा सविस्तर