Mahindra Thar : शक्तिशाली इंजिनसह पुन्हा लॉन्च होणार महिंद्रा थार! नवीन व्हेरियंटमध्ये असणार ही खास फीचर्स, किंमतही कमी

Published on -

Mahindra Thar : महिंद्रा कंपनीच्या थार प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता कंपनीकडून आणखी नवीन आणि शक्तीशाली रूपामध्ये महिंद्रा थार पुन्हा एकदा लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता थार कार खरेदी करत असताना अनेक मॉडेलचे पर्याय उपलब्ध होणार आहे.

थार कारणे भारतामध्ये आगोदरच मार्केट गाजवले आहे. तसेच यामध्ये देण्यात आलेले धमाकेदार फीचर्स ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहेत. भारतामध्ये आता कंपनीकडून नवीन रूपात शक्तिशाली ठार लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता थारची चर्चा अधिकच वाढू शकते.

सध्या थार ऑफ रोड SUV सेगमेंटमध्ये AX(O) आणि LX या दोन एंट्री लेव्हल हे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचा पर्याय मिळतो. पण आता कंपनीकडून तिसऱ्या वेरिएंटवर काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

थारच्या या नवीन वेरिएंटमध्ये 4 व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्य मिळेल आणि हा प्रकार AX(O) अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो. अधिक जाणून घेऊया थारच्या नवीन वेरिएंटबद्दल…

मारुती जिमनीसोबत लॉन्च केले जाईल

मारुती सुझुकीकडून थार कारला टक्कर देण्यासाठी ऑटो एक्सपोमध्ये जिमनी कार सादर करण्यात आली आहे. ही कार महिंद्राच्या थार या कारला टक्कर देईल असा कंपनीचा दावा आहे. या कारचा लूक जवळपास थार कारसारखाच आहे.

थारच्या नवीन वेरिएंटमध्ये 4 व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्य देण्यात येणार आहेत. या नवीन मॉडेलची सिरीज AX AC अशी असू शकते. कंपनीकडून अनेक नवीन फीचर्स या नवीन मॉडेलमध्ये दिली जाऊ शकतात.

इंजिन

सध्या थार कार ३ इंजिन पर्यायसह उपलब्ध आहे. बेस स्पेक 1.5-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 118hp पॉवर आणि 300Nm टॉर्क निर्माण करते. दुसरे इंजिन 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे 152hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे तिसरे इंजिन 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे जे 130hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते.

येत्या काळात महिंद्रा कंपनीकडून थारच्या नवीन मॉडेलमध्ये आणखी दोन इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. 2.0L पेट्रोल इंजिन आणि 2.2L डिझेल इंजिनसह थारचे नवीन मॉडेल लॉन्च केले जाणार आहे.

किंमत

सध्या बाजारातील थार कारची किंमत खूपच आहे. पण येत्या नवीन मॉडेलमध्ये कंपनीकडून किमतीमध्ये घट केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या थारच्या डिझेल प्रकारांची किंमत 9.99 लाख ते 16.49 लाख रुपये आहे, तर त्याच्या पेट्रोल पर्यायाची किंमत 13.49 लाख ते 15.82 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe