Bank Jobs 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तरुणांसाठी भरती काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवार त्याच्या अधिकृत वेबसाईट Centralbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, जी 3 एप्रिल 2023 रोजी संपणार आहे.
बँकेने बंपर रिक्त जागा काढल्या आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख
शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2023 आहे.
पात्रता काय हवी?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
विहित वयोमर्यादा
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी 600 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, PWBD उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाईट Centralbankofindia.co.in वर जा.
येथे होम पेजवर आता ‘लेटेस्ट रिक्रूटमेंट’ या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
आता ‘ऑनलाइन अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा.
यानंतर, मागितलेल्या तपशीलांसह नोंदणी करा.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज भरावा.
भरलेला अर्ज सबमिट करा आणि तो डाउनलोड करा.
आता फॉर्मची प्रिंट काढा.