ChatGPT : काय सांगता! ChatGPT मुळे व्यक्ती झाला मालामाल, तीन महिन्यात कमावले तब्बल 28 लाख रुपये; घरी बसून केले हे काम

Ahmednagarlive24 office
Published:

ChatGPT : जगभरात आजकाल अनेक नवनवीन शोध लागत आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्वकाही करणे सहज शक्य होत आहे. तसेच आता जगभरात ChatGPT आल्याने अनेकांना भीती आहे नोकरी जाण्याची. ChatGPT मुळे जगभरातील अनेक नागरिकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण एका ठिकाणी उलटेच घडले आहे. ChatGPT मुळे एक व्यक्ती तीन महिन्यात लखपती झाला आहे. तुम्हीही हे जाणून आश्चर्यचकित झाला असाल. पण हे खरं आहे. ChatGPT मुळे एका व्यक्तीला ३ महिन्यामध्ये तब्बल २८ लाख रुपये मिळाले आहेत.

ChatGPT हे नवीन तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्यामुळे ते अनेकांना माहिती नाही. ते शिकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. आता Udemy अभ्यासक्रम ऑफर करते जे तुम्हाला हे AI चॅटबॉट कार्यक्षमतेने कसे वापरायचे हे शिकवू शकतात.

ChatGPT मुळे अनेकांना नोकऱ्या जाण्याची भीती आहे. पण लान्स जंक नावाच्या व्यक्तीने अवघ्या तीन महिन्यांत $35,000 (सुमारे 28 लाख रुपये) कमावले आहेत. आता अनेकजण ChatGPT चा पैसे कमवण्यासाठी वापर करत आहेत.

व्यक्तीने ChatGPT मधून 28 लाख रुपये कमावले

लान्स जंक नावाच्या २३ वर्षीय व्यक्तीने ChatGPT कसे वापरायचे याचा ऑनलाईन कोर्स सुरु केला आहे. या कोर्समध्ये त्याने ChatGPT कसे वापरायचे हे लोकांना सांगितले. हा कोर्स ChatGPT कसे वापरायचे याबद्दल सांगण्यासाठी बनवण्यात आला आहे.

त्याच्या या कोर्ससाठी तीन महिन्यांत जगभरातून 15,000 हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. त्याने आतापर्यंत ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या कोरपासून तब्बल लाख रुपये कमावले आहेत.

लान्स जंकने सांगितले की तो एआय अॅपच्या क्षमतेने खूप प्रभावित झाला आहे आणि म्हणाला की तो बॉट प्रत्येकासाठी प्रवेशयोग्य बनवू इच्छितो. लोकांना ते कसे वापरायचे ते शिकवण्याची संधी देखील त्यांनी पाहिली जेणेकरून ते आश्चर्य साधनाचा सर्वोत्तम वापर करू शकतील.

जंक म्हणाला, ‘मला वाटते की लोक ChatGPT ला घाबरतात, म्हणून मी ते सोपे आणि रोमांचक, प्रवेशयोग्य बनवण्याचा प्रयत्न केला.’ तथापि, जंकने ChatGPT वर कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. त्याने सांगितले की तो स्वतः शिकला आहे.

भारतीयांनाही शिकायचे आहे

ChatGPT हे सर्वांनाच शिकायचे आहे. जगभरात याची मागणी वाढतच जाणार असल्याने सर्वांनाच हे शिकायचे आहे. जंक याने ChatGPT चा डिझाईन केलेला
कोर्स ७ तासांचा आहे. त्याची किंमत $20 इतकी आहे. यामध्ये नवीन शिकणाऱ्यांसाठी 50 व्याख्याने आहेत. जंकच्या या कोर्समध्ये प्रवेश घेतलेले बहुतेक विद्यार्थी हे यूएस मधील आहेत, यामुळे भारत, जपान आणि कॅनडामधील विद्यार्थी आकर्षित झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe