Ration Card Update : सरकारने घेतला धक्कादायक निर्णय! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

Ahilyanagarlive24 office
Published:

Ration Card Update : केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. त्याचा फायदाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापैकीच एक म्हणजे मोफत रेशन. देशातील करोडो लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत.

परंतु, सरकार आता काही लाभ घेत असणाऱ्या काही कडक नागरिकांवर कारवाई करत आहेत. कारण ते पात्र नसूनही मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. अपात्र लोक या योजनेचा लाभ घेत असल्याने पात्र असणाऱ्या नागरिकांना मोफत रेशन मिळत नाही.

अपात्र लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने नवी योजना आखली आहे. सध्या अपात्रांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत एकूण 10 लाख लोकांची ओळख पटली आहे, जे अपात्र असून मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. आता सरकार अशा लोकांवर कारवाई करत आहे.

फक्त या लोकांनाच मिळणार मोफत रेशन

अपात्रांची ओळख पटावी यासाठी केंद्र सरकारने आता अनेक योजना तयार केल्या असून त्यामुळे या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाही तर, राज्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे मानकांमध्ये सुधारणा करणे खूप गरजेचे आहे. एकही पात्र व्यक्ती मोफत रेशनपासून वंचित राहू नये म्हणून अपात्र लोकांना रेशनचे वितरण बंद करण्याची सरकारची योजना आहे. तसेच, नवीन मानक लागू झाले की फक्त पात्र व्यक्तींनाच याचा फायदा मिळणार आहे.

सुरू करण्यात आले आहे हे काम

तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बैठका घेतली जात आहेत. करोडो लाभार्थ्यांना म्हणजेच NFSA नुसार येणाऱ्या 86 टक्के लोकसंख्येला त्याचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन मोफत रेशनचा लाभ घेत आहे. इतकेच नाही तर अनेक राज्यांमध्ये लोकांनी रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ घेण्यास सुरुवात देखील केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe