SSY : तुमच्या मुलीचे भविष्य होईल सुरक्षित! त्वरित करा या योजनेत गुंतवणूक; मिळतील अनेक फायदे

SSY : सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत खूपच जागरूक झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिच्या भविष्याची त्यापेक्षा जास्त मुलीच्या लग्नाची जास्त काळजी असते. त्यामुळे ते लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात.

यातून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. परंतु आजच्या वाढत्या महागाईच्या काळात वाढणाऱ्या खर्चामुळं लोकांच्या बचतीवर याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे. तुम्ही आता सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही आता सुकन्या समृद्धी योजनेत गुंवतवणूक करून तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

सध्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना 8 टक्के इतके व्याजदर मिळत आहे. यापूर्वी या योजनेत गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना 7.6 टक्के व्याजदर उपलब्ध होता, परंतु जो नंतर 8 टक्के केला आहे.

या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडू शकता. यानंतर तुम्ही या योजनेत मुलीचे वय 21 किंवा 18 वर्षे होईपर्यंत खाते चालवता येते.

लक्षात ठेवा की तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी 50 टक्के इतकी रक्कम तुम्हाला काढता येते. इतकेच नाही तर मुलगी दहावी उत्तीर्ण झाली की तुम्ही योजनेतून पैसे काढू शकता.

या योजनेत तुम्हाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त रु 1.5 लाख गुंतवणूक करता येते. योजनेत तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe