10 Seater Car in India : फोर्स कंपनीकडून भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लॉन्च केली आहे. या कारला फोर्स सिटीलाइन असे नाव देण्यात आले आहे. नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात.
पण आता मोठे कुटुंब असणाऱ्यांसाठी फोर्स कंपनीची फोर्स सिटीलाइन ही कार उत्तम पर्याय आहे. ही कार पाहिल्यांनंतर टॅक्सी वाटणार नाही. या कारचे डिझाईन देखील आकर्षक बनवण्यात आले आहे.
अशी आहे बसण्याची व्यवस्था
फोर्स कंपनीच्या सिटीलाइन या कारमध्ये ड्राइव्हर सह ९ अतिरिक्त व्यक्ती बसू शकतात. सहसा ७ सीटर कारमध्ये ३ बसण्याच्या रांगा असतात. पण फोर्सच्या या १० सीटर कारमध्ये ४ बसण्याच्या रांगा देण्यात आल्या आहेत.
Forget 7-8 Seater Car. This Is Force Citiline with 10 Seater Option
price: Rs. 17.83 lakh (Ex-showroom, Delhi)
.
Diesel: 2596 cc, 91 HP Power, 250 Nm Torque,
63.5 litre Fuel Tank, 5-speed Manual Transmission, 3140 kg Gross Weight
.
.
.#ForceCitiline #ForceMotors #Citiline pic.twitter.com/Frmpsnu2DA— Vishal Ahlawat (@vishalahlawat92) February 22, 2023
यात पहिल्या रांगेत 2 लोक, दुसऱ्या रांगेत 3 लोक, तिसऱ्या मध्ये 2 लोक आणि चौथ्या मध्ये 3 लोक बसू शकतात. त्यामुळे या कारमध्ये जास्तीत जास्त प्रवाशी प्रवास करू शकतात. सहलीसाठी किंवा १० लोकांना फिरायला जाण्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.
आकार आणि इंजिन
फोर्स सिटीलाइन कार आकाराने खूप मोठी आहे. याची 5120mm लांबी, 1818mm रुंदी, 2027mm उंची आणि 3050mm व्हीलबेस आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 191 मिमी आहे.
Citiline कार 2.6-लिटर डिझेल इंजिनसह येते जे 91 अश्वशक्ती आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात 63.5 लीटरची इंधन टाकी, 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 3140 किलो वजन आहे. या कारची सुरुवातीची किंमत 16.5 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
वैशिष्ट्ये
फोर्सच्या या कारमध्ये शक्तिशाली ड्युअल एअर कंडिशनिंग, सेंट्रल लॉकिंग पॉवर विंडो, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, बॉटल होल्डर आणि सामानासाठी फोल्डिंग-प्रकारच्या शेवटच्या-रो सीट्स यांसारखी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
ग्राहक या कारमध्ये आरामात बसू शकतात आणि उतरू शकतात. या कारमध्ये बसण्याची व्यवस्था आरामदायी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना १० सीटर आरामदायी कार खरेदी करण्याची संधी मिळत आहे.