Bajaj Mileage Bike : सध्या वाढते इंधनाचे दर पाहता मोटरसायकलच्या बाबतीत मायलेजचा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. मार्केटमध्ये बजाजच्या मोटरसायकल या उत्तम मायलेजसाठी खूप प्रसिद्ध आहे. बजाज ऑटोच्या अनेक मोटरसायकल अशा आहेत ज्या 70-90 किमी प्रति लिटरचा मायलेज देतात.
बजाजची प्लॅटिना 110 ही मोटरसायकल तुफान मायलेज देत आहे. मायलेजच्या बाबतीत ही मोटरसायकल सगळ्यांचा बाप आहे. त्यामुळे मार्केटमध्ये या मोटरसायकलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोटरसायकलची किंमतही खूपच कमी आहे.
बजाज प्लॅटिना 110
कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी बजाज प्लॅटिना मध्ये खूप पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. यात तुम्हाला BS6 सह 102 cc सिंगल सिलेंडर इंजिन पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे DTS i तंत्रज्ञानावर काम करणारे इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन इंजिन आहे. जे इंजिन 7500 आणि 5500 rpm वर 7.9 तसेच 8.3 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. इतकेच नाही तर कंपनी ही बाइक तीन व्हेरियंटमध्ये बाजारात घेऊन आली आहे.
काय असणार वैशिष्ट्ये
कंपनीने या बाईकमध्ये अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. कंपनीच्या मतानुसार ही बाईक तुम्हाला 85 किमी पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. यात कंपनीने वाइड रबर फूटपॅड, डिस्क ब्रेक्स, एलईडी डीआरएल, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम, डिजिटल फ्युएल गेज, अॅनालॉग स्पीडोमीटर, बल्ब टाईप टेललाईट यांसारखी एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स दिली आहेत.
किती आहे किंमत?
कंपनीकडून या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 65 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही उत्तम मायलेज देणारी बाईक घ्यायची असल्यास ही उत्तम बजाज बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.