Honda Amaze : ‘या’ परवडणाऱ्या सेडान कारसाठी तुफान क्रेझ ! लॉन्च झाल्यापासून 5 लाख लोकांनी दाखवला विश्वास !

Ahmednagarlive24 office
Published:

Honda Amaze :   भारतीय बाजारात 10 वर्षांपूर्वी Honda Cars ने कंपनीची लोकप्रिय  कॉम्पॅक्ट सेडान कार Honda Amaze लाँच केली होती. तेव्हापासून बाजारात Honda Amaze राज्य करत आहे. आज बाजारात Honda Amaze खरेदी करणाऱ्यांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात आज  कमी किंमत, उत्तम मायलेज आणि जास्त स्पेसमुळे Honda Amaze बाजारात धुमाकूळ घालत आहे.

Honda Amaze ने भारतीय बाजारपेठेत 10 वर्षे पूर्ण केली आहेत आणि कंपनीचे म्हणणे आहे की लॉन्च झाल्यापासून त्यांनी कारच्या 5.3 लाख युनिट्सची विक्री केली आहे. Honda Cars India ने 2013 साली प्रथमच Amaze चे फर्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले. या कारला सुरुवातीला 1.2L I-VTEC पेट्रोल आणि 1.5L I-DTEC डिझेल इंजिन देण्यात आले होते. त्याचे पेट्रोल व्हेरियंट ऑटोमॅटिक व्हेरियंटसह देखील उपलब्ध होते. एवढेच नाही तर कंपनीने CNG पर्यायासह पेट्रोल व्हेरिएंटही सादर केले. सध्या ही सेडान कार फक्त पेट्रोल इंजिन पर्यायासह येते.

अमेझचे फर्स्ट जनरेशन मॉडेल जवळपास तीन वर्षे बाजारात विकले गेले आणि या काळात कंपनीने 2.6 लाख युनिट्स विकले. त्यावेळी या सेडानची किंमत 5.27 लाख ते 8.29 लाख रुपये होती. तोपर्यंत, अमेझने सब-फोर मीटर सेडान कार सेगमेंटमध्ये चांगली पकड निर्माण केली होती. त्याचे फेसलिफ्ट मॉडेल 2016-18 मध्ये सादर करण्यात आले होते.

सेकंड जनरेशन मॉडेल लाँच 

2018 मध्ये कंपनीने Honda Amaze चे सेकंड जनरेशन मॉडेल बाजारात आणले. ही कार अनेक मोठ्या बदलांसह सादर करण्यात आली. यात नवीन हेडलॅम्प, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सारखी फीचर्स आहेत. कार एक डिझेल आणि दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली होती. तथापि, सेकंड जनरेशनच्या मॉडेलपासून, कंपनीने सीएनजी व्हेरियंट बंद केला आणि त्यावेळी त्याची किंमत 5.41 लाख ते 11.11 लाख रुपये होती.

लेटेस्ट मॉडल 2021 मध्ये आले

2021 मध्ये, कंपनीने Honda Amaze च्या सेकंड जनरेशनच्या मॉडेलला एक फेसलिफ्ट दिली जी सध्या बाजारात आहे. कंपनीने या कारमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी फॉग्लॅम्प्स, पॉवर आऊट साइड रीअर व्ह्यू मिरर (ORVM’s), डायमंड कट अलॉय व्हील यांसारखी फीचर्स दिली आहेत. नवीन बदलांमुळे कारला थोडा प्रीमियम लुक आणि फील दिला आहे. या कारमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटण, पॅडल शिफ्टर, ऑटोमॅटिक क्रूझ कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Honda Amaze

इंजिन: 1.2L i-VTEC पेट्रोल

ट्रान्समिशन: 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT

बूट स्पेस: 480 लिटर

मायलेज: 18 kmpl

किंमत: 6.99 लाख ते 9.60 लाख रुपये

Honda Amaze च्या सध्याच्या मॉडेलमध्ये कंपनीने 1.2 लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 88 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

सर्वसाधारणपणे ही कार 18 ते 19 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. कारला 480 लीटर बूट स्पेस देखील मिळते. त्याची किंमत 6.99 लाख ते 9.60 लाख रुपये आहे. बाजारात ही कार प्रामुख्याने मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ऑरा सारख्या कारशी स्पर्धा करते.

हे पण वाचा :- Chaturgrahi Yog 2023: 12 वर्षांनंतर तयार होणार चतुर्ग्रही योग ! ‘या’ 4 राशींच्या लोकांनी सावध राहावे ; होणार धनहानी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe