साईबाबांवर टीका करणारे नरकाचे भागी, कालीचरण महाराजांनी बागेश्वर महाराजांना झापले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News  : हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईबाबा आहेत. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग व ५१ शक्तिपीठ आहेत, तसेच साईंबाबांचेही स्थान हिंदूंसाठी परम पवित्र असून ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यांच्यावर टीका केली, तर सगळीकडे नकारात्मक प्रसिद्धी मिळते.

त्यामुळे अशी षडयंत्र प्रसिद्धीसाठी केले जाते. लोक साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांवर टीका करतात, तेव्हा निसंशय ते नरकाचे भागी असतात, असे मत कालीचरण महाराज यांनी शिर्डीत व्यक्त केले. कालीचरण महाराज यांनी शुक्रवारी दुपारी साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांना पाहण्यास त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पत्रकारांशी बोलताना महाराज म्हणाले की, परमसिद्ध संत साईनाथ महाराजांच्या दरबारात येऊन खूप शांती प्राप्त झाली व ऊर्जा प्राप्त झाली. सकल हिंदू समाजाला माझं सांगणं आहे की, इथे येऊन जे लोक साधना करतील, त्यांची आध्यात्मिक प्रगती निसंशय होईल.

त्यांच्या हृदयात धर्मजागृती होईल. याची अनुभूती आम्हालादेखील आली आहे. आम्ही शिर्डीत येऊन धन्य झालो आहे. बागेश्‍वरधामच्या धीरेंद्र शास्त्रींचा साईबाबांवरील वक्तव्याचा अर्थ मला काही माहिती नाही, परंतु श्री साईबाबा निसंशय ब्रम्ह साक्षात्कारी महापुरुष आहेत. शास्त्र सिद्धांतानुसार ज्यांना साक्षात्कार झालेला असतो,

ते स्वतःच परब्रम्ह सुरू करतात. म्हणूनच साईबाबांच्या जय जयकारात श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय, असं म्हटलं जातं. सच्चिदानंद म्हणजे परमात्मा. ज्या व्यक्‍तीला, ज्या साधकाला, ज्या महापुरुषाला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे,

तो इंश्वरस्वरूपच बनत असतो. म्हणूनच साईबाबा परमात्मा स्वरूपच आहेत. ते भक्तांसाठी धावून येतात. त्यांच्या चमत्काराचे करोडो अनुभव लोकांना आहेत. हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईंबाबा आहेत, असे महाराज म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe