Maruti Suzuki Swift : देशातली सर्वात जास्त विक्री करणारी कार मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता 2.5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, तिचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 9 लाख रुपये मोजावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ही कार भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. तुम्ही आता ती खूप स्वस्तात खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर कुठे मिळत आहे? जाणून घ्या.
मारुती सुझुकी स्विफ्ट
वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट लखनऊ आणि पटनामध्ये विक्रीसाठी ऑफर केली आहे. तिचे हे 2015 मॉडेल येथे उपलब्ध आहे. तसेच ही कार 45 हजार किमी धावली असून या कारसाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही सेकंड हँड कार आहे.
तसेच या मारुती सुझुकी कारचे 2018 मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार सुमारे 78 हजार किमी धावली असून ही कार नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारसाठी 3.80 लाख रुपयांची मागणी केली आहे.
किती आहे किंमत?
कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 9 लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही आलिशान कार घ्यायची असेल तर मारुती सुझुकीची ही मस्त कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.