टाकळीभान | टाकळीभान – घोगरगाव रस्त्यावर धुमाळवस्तीजवळ रविवारी सकाळी ८.३o च्या दरम्यान अपघात झाला.
या अपघातात मारियाबाई ज्ञानदेव शिरसाठ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. घोगरगावहून लग्न समारंभासाठी निघालेल्या मारिया शिरसाठ व शिरसाठ हे हीरो होंडा मोटारसायकलीवरून (एमएच १२ व्ही ३६६४) टाकळीभानच्या दिशेने चालले होते.
घोगरगावकडून टाकळीभानकडे चाललेला टेम्पोची (एमएच १६ ए ई ५१०९) धुमाळवस्तीजवळ धडक होऊन अपघात झाला.
यात महिला जागीच ठार झाली, तर मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाला.
अपघात झाल्यावर टेम्पोचालक टेम्पो सोडून पळून गेला. टाकळीभान दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल पवार व पोलिस मित्र बाबा सय्यद यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
टेम्पो रस्त्यात असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्ता खराब असल्यामुळे अपघात झाल्याचे निदर्शनास आले.
- Bank Holidays 2024 : ‘या’ महिन्यात 14 दिवस बंद राहतील बँका, कधी आहेत सुट्ट्या जाणून घ्या…
- मोदींची अहमदनगरमधील सभा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अभिवादन..असे म्हणत सुरवात, विखेंना केलेले मतदान मोदींना मजबूत करेल असे म्हणत शेवट,आरक्षणावरही भाष्य, पहा
- Cotton Seeds: कापूस बियाण्याची 16 मे पूर्वी विक्री केली तर होणार थेट कारवाई कारण की…
- New Maruti Suzuki Swift : दोन दिवसात लॉन्च होणार मारुतीची नवीन कार, किंमत असेल खूपच कमी!
- OnePlus Nord : वनप्लसच्या ‘या’ अप्रतिम फोनची किंमत झाली कमी, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!