Samsung Galaxy Z Flip3 5G : सध्या बाजारात उत्तम फीचर्समुळे धुमाकूळ घालणारा Samsung चा फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 3 5G तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता Samsung Galaxy Z Flip 3 5G बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा फोन फ्लिपकार्टवर अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही हा फोन अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये कसा खरेदी करू शकतात.
Samsung Galaxy Z Flip 3 5G ऑफर
Samsung Galaxy Z Flip 3 5G च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची MRP 95,999 रुपये आहे. पण हा फोन Flipkart वर 27 टक्के डिस्काउंटनंतर 69,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
फोनच्या खरेदीवर 27,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला तर फोनची किंमत 42,000 रुपयांपर्यंत खाली येते. Axis Bank क्रेडिट कार्डच्या खरेदीवर फोनवर 10 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. हा फोन 11,667 रुपयांच्या मंथली नो-कॉस्ट EMI पर्यायावर खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे. यासोबतच 6 महिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे. Samsung Galaxy Z Flip3 5G च्या खरेदीवर 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी दिली जात आहे.
Samsung Galaxy Z Flip 3 5G तपशील
Samsung Galaxy Z Flip3 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 12MP चा आहे. याशिवाय आणखी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनच्या समोर 10MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 3300 mAh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- Bikes Under 1 Lakh: ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ 5 दमदार बाइक्स ; मायलेजमध्ये आहे बाप ; किंमत फक्त ..