आनंदाची बातमी ! पदवीधर उमेदवारांना ‘या’ कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आपण रोजच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट घेऊन हजर होत असतो. विशेषता सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आपण नोकरी संदर्भात माहिती रोजाना देत असतो. दरम्यान आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी निघालेल्या भरतीची माहिती जाणून घेणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी या ठिकाणी रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून या भरतीच्या माध्यमातून प्रक्षेत्र सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या भरती बाबत आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शिंदे सरकारने घोळ संपवला; ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय, पहा…..

किती रिक्त पदांसाठी आहे भरती

रत्नागिरी कृषी विद्यापीठात प्रक्षेत्र सहाय्यक पदाच्या एकूण पाच रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा कृषी पदवीधर असावा. तसेच संबंधित उमेदवाराने एम एस सी आय टी बेसिक कम्प्युटरचा कोर्स केलेला असणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात तसेच कामाच्या अनुभवासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना मात्र उमेदवाराला वाचावी लागणार आहे.

वयोमर्यादा

सर्वसाधारण प्रवर्गातील कमाल 38 वर्षे वयाचा उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट या ठिकाणी दिली जाणार आहे.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! कर्ज घेण्यासाठी नेमका सिबिल स्कोर किती असावा?, पहा काय म्हणताय तज्ञ

किती वेतन मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा हजार रुपये प्रति महिना वेतन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागेल?

यासाठी इच्छुकाने पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. संचालक संशोधन केंद्र वाकवली प्रशासकीय कार्यालय दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी उमेदवाराला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात असून अर्ज प्रक्रिया 13 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विहित कालावधीमध्ये आपला अर्ज पाठवण्याचे आवाहन या ठिकाणी केले जात आहे.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती;…