Best Summer Destination : या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील भारतातील अशा काही सुंदर नैसर्गिक ठिकाणी सहलीचे आयोजन करू शकता. सहलीसाठी तुम्हाला भारताबाहेर जाण्याची गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी तुम्हाला विदेशातील आनंद देऊ शकतात.
भारतात अशी काही हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता. या ठिकाणी तुम्ही गार वारे, नद्या, धबधबे आणि घनदाट जंगलांचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसातल्या ठिकाणी दरवर्षीं लाखो पर्यटक भेट देत असतात.

धर्मशाला
या ठिकाणी वर्षभर लाखो पर्यटक येत असतात. उंचच्या उंच पर्वत रांगा आणि मठ पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही येथे पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
कुफरी
हे एक उत्तम बर्फाळ ठिकाण आहे. जर तुम्हाला बर्फाचा आनंद घेईचा असेल तर या ठिकाणी भेट देऊ शकता. महासू पर्वताच्या शिखरावर तुम्ही स्कीइंगचा आनंद घेऊ शकता. येथे असलेल्या हिमालयन नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला प्राण्यांच्या अनेक विचित्र प्रजाती पाहायला मिळतील.
लडाख
दरवर्षीं लाखो पर्यटक लडाखला भेट देत असतात. या ठिकाणी अनेक पर्यटक बाईक रायडींगचा आनंद घेत असतात. लडाखला भेट देण्याचा सर्वोत्तम पर्यटन हंगाम एप्रिल ते ऑगस्ट असतो. हवामानातील कमी तापमानामुळे लोक उन्हाळ्यात लडाखला जाण्यास प्राधान्य देतात.
सिक्कीम
सिक्कीम या ठिकाणी तुम्हाला अनेक मठ पाहायला मिळतील. येथे नाथू ला, भारत-चीन सीमा आणि रुमटेक मठाचे अद्भुत दृश्य पाहता येईल. जून महिन्यात तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. लाचुंग आणि युमथांग व्हॅली व्यतिरिक्त, तुम्ही तिस्ता नदीवर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
तवांग
तवांग हे हस्तकलेचे केंद्र आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण केंद्र म्हणजे तवांग मठ हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे. यासोबतच तवांगमध्ये डोंगर आणि तलावाच्या सौंदर्याचाही आनंद लुटता येतो. येथे तुम्ही मॉनेस्ट्री गाल्डेन नामगे ल्हत्से नावाच्या भारतातील सर्वात मोठ्या मठाला देखील भेट देऊ शकता.
मेघालय
तुम्हाला सुंदर आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेली दृश्ये पाहायची असतील तर तुम्ही मेघालयला भेट देऊ शकता. मेघालयातील सुंदर पाऊस पाहण्यासाठी पर्यटक खास येथे येतात. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.