IMD Alert : पुढील २४ तासांत या १० राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

Published on -

IMD Alert : उन्हाळ्याचे दिवस सुरु असताना हवामानात बदल झाल्याने अवकाळी पाऊस सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोसळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. तसेच काही भागातील उष्णतेत वाढ झाली आहे.

आता भारतीय हवामान खात्याकडून येत्या २४ तासांत १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काही राज्यांमध्ये तापमान ४० अशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आजही अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे

खाजगी हवामान खाते स्कायमेट वेदरनुसार उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये पाऊस पडेल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तराखंडमध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच केरळच्या दक्षिण भागात हलका पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. दक्षिण गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशातही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित भागात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या ठिकाणी उष्णतेची लाट

काही भागात पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल तर ओडिशाच्या काही भागात आज, 13 ते 16 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा अंदाज जारी करण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात तीव्र उष्णता जाणवेल.

तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला

मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणामध्ये सध्या तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. त्याच वेळी, काही राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या खाली आहे. जम्मू आणि काश्मीर, ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारत आणि किनारी आंध्र प्रदेशात कमाल तापमान सामान्यपेक्षा २-३ अंश सेल्सिअस जास्त होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe