Kia Seltos 2023 : सेलटोसचे नवीन अवतारात कमबॅक! जाणून घ्या जबरदस्त वैशिष्ट्ये आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Kia Seltos 2023 : किया मोटर्सने आपल्या बहुप्रतीक्षित असणाऱ्या आगामी कारचे मॉडेल लाँच केले आहे. त्यामुळे आता सर्वात जास्त विक्री करणाऱ्या क्रेटासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण आता किआ मोटर्सने सेलटोसचे नवीन अवतारात कमबॅक केले आहे.

यात ग्राहकांना नवीन फीचर्स तर मिळतीलच परंतु नवीन कार एका स्टायलिश अवतारात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कियाची आगामी कार उत्तम पर्याय असू शकते.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनीकडून आपल्या नवीन Kia Seltos मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात कंपनीने नवीन ग्रिल, व्हर्टिकल आऊट आइस क्यूब एलईडी लाईट्स, 18 इंच अलॉय व्हील, 10.25 इंच पॅनोरमिक डिस्प्ले, मल्टी झोन ​​क्लायमेट कंट्रोल, हीट फ्रंट सीट्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, बोस प्रीमियम ऑडिओ, वायरलेस चार्जिंग, स्मार्ट पॉवर टेलगेट, सनरूफ यांसारखे शानदार फीचर्स दिले आहेत. इतकेच नाही तर यामध्ये एडीएएस सिस्टीमही दिली आहे.

कसे असणार नवीन Kia चे इंजिन

कंपनीकडून या कारमध्ये दोन इंजिन देण्यात येत आहेत. तसेच यात 2 लिटरचे 4 सिलेंडर इंजिन असून हे इंजिन 146 hp आणि 179 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर, दुसरे इंजिन 1.6 लिटरचे टर्बोचार्ज केलेले चार सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे.

किती असणार आगामी कारची किंमत

कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 24.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याचा विचार करत असल्यास तर Kia Motors ची ही शानदार कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe