Surya Grahan 2023 : 2023 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण वैशाख महिन्यातील अमावास्येला म्हणजेच 20 एप्रिल रोजी होणार आहे. जरी हे ग्रहण भारतात दिसत नसले तरी त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ठिकाणी सुतक काळ वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर, दक्षिण आशिया, प्रशांत महासागर आणि पूर्व आशियामध्ये दिसणार आहे. यावर्षी एकूण 2 सूर्यग्रहण आणि उर्वरित 2 चंद्रग्रहण आहेत.
या राशीच्या लोकांना बसणार मोठा फटका
या वर्षाचे पहिले ग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होणार असून त्यामुळे या ग्रहणाचा मेष राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम दिसून येईल.
मेष राशी
सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे खुप गरजेचे आहे. कारण मेष राशीच्या लोकांना ग्रहणाच्या प्रभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूर्यग्रहणाच्या काळात मेष राशीच्या लोकांना त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल.
या राशींना होणार मोठा फायदा
20 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण वृषभ, मिथुन, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असून तर मेष राशीसह सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांसाठी ते चढ उताराचे असणार आहे.
लगेच करा हा उपाय
इतकेच नाही तर, सूर्यग्रहण कर्क, तूळ आणि कुंभ राशीसह सर्व राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव टाकणार आहे. परंतु, ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी उपायही सांगितले आहेत. असे मानले जात आहे की तुळशीची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने सर्व राशीच्या लोकांना त्याचा फायदा होतो.