Skoda Kushaq : शक्तिशाली फीचर्ससह स्कोडाच्या दोन कार बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य…

Ahmednagarlive24 office
Published:

Skoda Kushaq : सर्वात लोकप्रिय कंपनी स्कोडाच्या Kushaq आणि Slavia च्या नवीन आवृत्तीने मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. या दोन्ही कारमध्ये कंपनीकडून सर्वोत्तम वैशिष्ट्य देण्यात आली आहेत. या दोन्ही कारचे स्टायलिश लूक आता वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहे.

इतकेच नाही तर यात शानदार फीचर्स देण्यात येणार आहेत. जर या कारच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 19.19 लाख रुपये असणार आहे. तसेच यात मायलेज उत्तम मिळणार आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर

Skoda Kushaq वर्धापनदिन

Skoda Kushaq ची वर्धापनदिन आवृत्ती कारच्या लाइनअपमधील स्टाईल आणि मॉन्टे कार्लो ट्रिम्स दरम्यान स्थित असून यामध्ये 1.5-लिटर TSI इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन आणि DSG ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात येत आहे.

कुशकच्या अॅनिव्हर्सरी एडिशनमधील मुख्य बदलांमध्ये ग्रिल आणि दरवाजाच्या खालच्या भागांवर क्रोम इन्सर्ट, बी-पिलरवर ‘अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन’ बॅजिंग, कुशक बॅजिंगसह स्कफ प्लेट्स आणि अॅनिव्हर्सरी एडिशन कुशन पिलो यांचा समावेश असणार आहे.

स्कोडा स्लाव्हिया वर्धापनदिन

इतकेच नाही तर आता या कारच्या लाइनअपमध्ये स्कोडा स्लाव्हियाची वर्धापनदिन आवृत्ती स्टाईल वेरिएंटच्या वर ठेवली आहे. कंपनी यामध्ये 1.5-लिटर TSI इंजिन देत आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशन आणि DSG ट्रान्समिशन पर्यायांसह येत आहे. स्लाव्हियाला क्रोम-फिनिश फ्रंट ग्रिल, साइड क्लॅडिंगवर क्रोम इन्सर्ट, अॅल्युमिनियम पेडल्स, ‘अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन’ स्टीयरिंग बॅजेस, सी-पिलर आणि स्कफ प्लेटवर ‘एनिव्हर्सरी एडिशन’ ब्रँडिंग आणि अॅनिव्हर्सरीसह काही अपग्रेड्स मिळत आहे.

किती आहे किंमत?

कंपनीकडून या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 17.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 19.19 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe