पंजाबरावांचा हवामान अंदाज; 18 एप्रिलपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, मे महिन्यातील ‘या’ तारखा देखील पावसाच्याच, डख यांचा नवीन अंदाज, पहा…..

Ajay Patil
Updated:
Punjab Dakh Breaking News

Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत.

अशातच आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. एकंदरीत राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचे चित्र आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यात सलग पाऊस पडत आहे. अशातच 17 एप्रिलपासून राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे.

हे पण वाचा :- सिबिल स्कोर झिरो असतांनाहि मिळणार कर्ज ! काय असतात यासाठी अटी? पहा….

मात्र आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या डख यांनी राज्यात 18 एप्रिल पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. 18, 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

यादरम्यान पडणारा पाऊस मात्र भाग बदलत आणि तुरळक ठिकाणी पडेल असे मत डख यांनी व्यक्त केले आहे. निश्चितच जर डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी या ठिकाणी मांडणार आहे. वास्तविक गेल्या महिन्यात आणि या महिन्यातील डख यांचे आतापर्यंतचे सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे हा देखील अंदाज खरा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार 600 रुपयात 1 ब्रास वाळू; नगर जिल्ह्यात होणार प्रथम अंमलबजावणी, महसूलमंत्र्यांची माहिती, पहा……

दरम्यान एप्रिल महिन्यात तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेच आहे शिवाय मे महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस पडणार आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि 15 मे नंतर अवकाळी पाऊस राज्यात पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

म्हणजे आता जवळपास संपूर्ण उन्हाळा हा अवकाळी पावसातच जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे निश्चितच नुकसान या ठिकाणी होत असून आगामी काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना विशेष सजग राहण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe