Air Conditioner Discount : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण मार्केटमध्ये थंड हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. बाजारातील थंड हवा देणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांची किंमत देखील जास्त असल्याने अनेकजण ते खरेदी करत नाहीत.
जर तुम्हाला या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये एसी खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाइट वर अनेक एसीवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते.
Amazon चा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल 2023 सुरु आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 70 टक्क्यांहून अधिक सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील Amazon वरून इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करून पैशांची बचत करू शकता.
LG 1.5 टन 5 स्टार AI ड्युअल इन्व्हर्टर स्प्लिट AC
तुम्हाला LG कंपनीचा एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon Sale 2023 अंतर्गत, ग्राहक 1.5 टन 5 स्टार LG AC 45,490 रुपयांना मिळत आहे. हा एसी एसी 6-इन-1 कूलिंग मोडसह येतात आणि एचडी फिल्टरसह सुसज्ज आहे.
पॅनासोनिक 1.5 टन 5 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्मार्ट स्प्लिट एसी
जर तुम्हाला Panasonic कंपनीचा एसी खरेदी करायचा असेल तर पॅनासोनिक 1.5 टन 5 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्मार्ट स्प्लिट एसी तुम्ही खरेदी करू शकता. या एसीची सेलमध्ये किंमत 44,990 रुपये आहे. या एसीमध्ये AI मोडसह 7-in-1 परिवर्तनीय मोड देण्यात आला आहे.
डायकिन 1.5 टन 5 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी
Amazon Sale 2023 मध्ये, ग्राहकांना 1.5 टन 5 स्टार Daikin AC खरेदी करण्याची संधी आहे. हे एसी 6-इन-1 कूलिंग मोडसह येतात आणि एचडी फिल्टरसह सुसज्ज आहेत.
याशिवाय, Daikin AC मध्ये इन्व्हर्टर कंप्रेसर, टर्बो कुलिंग, 3D एअरफ्लो, रिमोट कंट्रोल, ड्यू क्लीन टेक्नॉलॉजी, ट्रिपल डिस्प्ले, ऑटोमॅटिक मॉइश्चर कंट्रोल, PM 2.5 फिल्टर, डस्ट फिल्टर आणि ऑटो क्लीन ही वैशिष्ट्ये आहेत. या एसीची किंमत 45,490 रुपये आहे.
व्होल्टास 1.4 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी
Voltas AC वर Amazon Sale 2023 मध्ये 55 टक्के सूट दिली जात आहे. व्होल्टास 1.4 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट हा एसी सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसीपैकी एक आहे. जो आकाराने लहान आहे आणि स्वस्त देखील आहे.
या एसीमध्ये अँटी डस्ट, अँटीमाइक्रोबियल प्रोटेक्शन, अँटी-कोरोसिव्ह कोटिंग, एलईडी डिस्प्ले, सेल्फ डायग्नोसिस, स्लीप मोड, टर्बो आणि अॅडजस्टेबल कूलिंग यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. Voltas AC ची किंमत 31,999 रुपये आहे.