Dual Inverter AC : दिवसभर बिनधास्त वापरा एलजीचा एसी, सुपरफास्ट कूलिंगसह वीजबिलही येईल कमी

Ahmednagarlive24 office
Published:

Dual Inverter AC : सध्या उन्हाचा कडाका खूप वाढत आहे. त्यामुळे कुलिंग डिव्हाइसेसची गरजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वापर जास्त असल्यामुळे वीजबिलही जास्त येत आहे. एसीच्या जास्त वापरामुळे फक्त वाढत्या वीज बिलाचे टेन्शन अनेकांच्या मनात येते.

सध्या वाढत्या लाईट बिलामुळे सगळेजण त्रस्त आहेत. बाजारात सध्या एलजीचा एसी उपलब्ध आहे. जो तुम्ही कितीही वापरला तरीही त्याचे वीजबिल कमी प्रमाणात येते. वीजबिल कमी कारण्यासोबतही तो सुपरफास्ट कूलिंग देत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोली थंड झाली तर, हे एसी आपोआप आतील तापमान तपासून रोटरचा वेग कमी करतात आणि या प्रक्रियेद्वारे, हा एसी दररोज अनेक युनिट विजेची बचत करतो. त्याची मोटर अगदी कमी वेगात फिरते. इतकेच नाही तर हा एसी चालवत असताना खूप कमी आवाज करतो. तो इतका शांत आहे की अनेकांना तो चालू आहे की नाही हे समजत नाही.

काय आहेत या एसीचे फायदे ?

समजा तुम्ही तुमच्या घरात जुना नॉर्मल एसी बसवला असल्यास तुम्हाला थंड होण्यास उशीर होतो. तर दुसरीकडे, ड्युअल इन्व्हर्टर एसीच्या कंप्रेसरमध्ये दोन BLDC मोटर्स असून जे कूलिंग प्रक्रियेला अनेक पटींनी गती देतात. तसेच ते कमी वेळेत खोली थंड करतात. या ड्युअल इन्व्हर्टर एसीचे सगळ्यात मोठे फिचर म्हणजे त्याचे सायलेंट ऑपरेशन.

नॉर्मल एसीच्या कंप्रेसरमध्ये एसी पॉवर सप्लायवर फक्त एकच रोटर चालू असतो, परंतु त्याला हवा थंड करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कंपनी यामध्ये सायलेंट कंप्रेसर मोटर वापरत असून, जी खूप कमी कंपन करते, ज्यामुळे तुमची रात्रीची झोप कसलीच खराब होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe