Tata SUV : ग्राहकांना पुन्हा धक्का! टाटाच्या ‘या’ एसयूव्हीच्या किमतीत पुन्हा होणार वाढ, जाणून घ्या नवीन किंमत

Published on -

Tata SUV : टाटा मोटर्स सतत भारतीय बाजारात नवनवीन कार लाँच करत असते. सध्या बाजारात SUV ची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कंपन्या एकापेक्षा एक शानदार SUV लाँच करत आहेत. अनेक कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ केली आहे.

अशातच आता टाटानेही ग्राहकांना धक्का दिला आहे. टाटाने सर्वात जास्त विक्री करणाऱ्या SUV च्या किमतीत वाढ केली आहे. या SUV खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान कंपनीने या वर्षात दुसऱ्यांदा कारच्या किमतीत वाढ केली आहे.

टाटा मोटर्सने याबाबत असे सांगितले की, ऑटो क्षेत्रातील नियमांमध्ये बदल आणि खर्चात वाढ झाली असल्यामुळे वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनीकडून उचलला जात आहे. मात्र, आता खर्चाचा काही भाग ग्राहकांना देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार्‍या BS6 फेज-II उत्सर्जन नियमांमधील बदलामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

कोणत्या मॉडेल्सचा आहे समावेश?

कार आता कमी उत्सर्जन देत असून E20 इंधनावर चालण्यासाठी तयार आहेत. नुकत्याच या वर्षांत नवीन कारच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या कंपनीच्या एंट्री-लेव्हल टियागो आणि टिगोरपासून ते पंच, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी एसयूव्हीपर्यंतच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ होऊ शकते. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीस या नवीन कारच्या किमती उपलब्ध होणार आहे.

व्यावसायिक वाहनांच्या किमतीत झाली वाढ

हे लक्षात घ्या की केवळ टाटा मोटर्सच नाही तर इतर वाहन निर्मात्यांनीही या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये किमती वाढ करण्यात आली आहे. मारुती आणि ह्युंदाई ते होंडा पर्यंतच्या कार निर्मात्यांनी मॉडेलच्या आधारावर 2,000 ते 15,000 रुपयांपर्यंत किमतीत वाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या टाटानेही सुरुवातीला आपल्या व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!