Today Horoscope : खरं तर ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा संयोगाला खूप महत्त्व असते. कारण याच ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. या पैकी काही राशींना याचे शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळत असतात.
येत्या 22 एप्रिल रोजी गुरू हा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. इतकेच नाही तर सध्या राहू मेष राशीत आहे. त्यामुळे गुरु आणि राहू मेष राशीत प्रवेश केल्यामुळे गुरु-चांडाळ हा योग तयार होत असल्याने याचा सर्व राशींवर गुरु-चांडाळ योगाचा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे.

मेष – या राशींच्या लोकांचे मन अस्वस्थ राहील. या लोकांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तसेच तुमच्या कुटुंबात धार्मिक कार्य करता येणार आहे.धावपळ जास्त होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे सहकार्य मिळेल. इतकेच नाही तर शैक्षणिक कार्यात थोडी सुधारणा होईल आणि उत्पन्नात वाढ होईल.
वृषभ – या राशींच्या लोकांचे मन प्रसन्न राहून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. असे असले तरीही धीर धरण्याचा प्रयत्न करा.निरुपयोगी वादविवाद टाळावा. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळून प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवा. त्याच्याशिवाय राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळावा.संभाषणात संतुलित रहा.नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा कारण तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतील.
कर्क – तुमचे मन प्रसन्न राहून तुमचा आत्मविश्वास भरलेला असणार आहे, मात्र अतिउत्साही होणे टाळा.अनावश्यक राग आणि वादविवाद टाळावा. या राशींच्या लोकांनाही नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
सिंह – मन अस्वस्थ राहून या राशीच्या लोकांना आत्मविश्वासाची कमतरता राहील. त्यामुळे शांत राहून अनावश्यक राग टाळा.इतकेच नाही तर कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा.तुमची वाचनाची आवड वाढत जाईल आणि वैवाहिक सुखात देखील वाढ होईल.
कन्या – या राशीच्या लोकांच्या वाणीत गोडवा राहील, मात्र त्यांचे मन चंचल राहील. त्यामुळे त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक राग टाळून आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय क्षेत्रातील खर्चात वाढ होईल तसेच व्यवसायात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
तूळ – मन अस्वस्थ होईल त्यामुळे त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवा. धीर धरावा. या राशीच्या लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मात्र कामाचा ताण वाढू शकतो. तसेच उत्पन्न वाढेल.
वृश्चिक – मन प्रसन्न राहू शकते मात्र मनात अनेक चढ आणि उतार असतील. या लोकांना आत्मविश्वासाची कमतरता असेल. व्यवसायात वाढ होऊन मेहनतही मोठ्या प्रमाणात होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्पन्नही वाढेल.
धनु – मन प्रसन्न राहून आत्मविश्वासही जास्त असेल. नोकरीत बदल होऊन उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्षेत्रात बदल होईल त्यामुळे मेहनत जास्त असणार आहे.
मकर – मन अस्वस्थ राहणार आहे. इतकेच नाही तर या राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होऊ शकतो. उच्च पद मिळेल सत्ताधारी प्रशासनाकडून मदत करण्यात येईल. त्यामुळे जास्त धावपळ होईल.
कुंभ – आत्मविश्वासाची कमतरता राहून संभाषणात संतुलन ठेवावे. वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तसेच तुमचा नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
मीन – तुमच्या मनात आशा आणि निराशेच्या भावना येतील. शैक्षणिक कार्यात रुची राहून वाणीचा प्रभाव वाढेल. इतकेच नाही तर तुमच्या कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळेल.