Vivo Foldable Phone : ओप्पोला टक्कर देणाऱ्या Vivo X Fold 2 आणि X Flip या स्टायलिश फोनची फीचर्स लाँचपूर्वीच झाली लीक, किंमत आहे..

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo Foldable Phone : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आपले दोन आगामी Vivo X Fold 2 आणि X Flip स्टायलिश फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे हे फोन लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये अगोदरपासून असणाऱ्या सॅमसंग आणि ओप्पोला कडवी टक्कर देऊ शकतात.

परंतु या फोनचे लाँच पूर्वीच फीचर्स लीक झाले आहे. येत्या 20 एप्रिल रोजी कंपनी चीनमध्ये Vivo X Fold 2 आणि X Flip हे फोन लाँच करणार आहे. या दोन्ही फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा असणार आहे. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती.

विवोच्या आगामी फोल्डेबल फोनची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. या वेगवेगळ्या लीकमध्ये फोल्डेबल फोनची किंमत 90,000 ते 1 लाख रुपयांदरम्यान सांगण्यात येत आहे. Oppo आणि Tecno चे फोल्डेबल फोन 80 ते 90 हजारांच्या दरम्यान येत आहेत.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

Vivo X Flip: फोल्डेबल फोन प्रमाणेच या फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे. या फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे असणार आहेत ज्यामध्ये एक 50MP मुख्य कॅमेरा आणि 12MP दुय्यम कॅमेरा असणार आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP कॅमेरा दिला जाणार आहे. Vivo X Flip स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. आगामी स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८ प्लस वन जनरेशनवर काम करू शकतो.

Vivo X Fold 2: हा फोल्डेबल फोन 4800 mAh बॅटरीसह येत आहे जो 120 W फास्ट चार्जिंग आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये मुख्य डिस्प्ले 8.03 इंच असणार आहे, दुय्यम डिस्प्ले 6.53 इंच असणार आहे. कंपनी हा फोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करू शकते. ज्यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असणार आहे.

कंपनीच्या या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP पोर्ट्रेट कॅमेरा दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा उपलब्ध असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe