Akshaya Tritiya 2023: देशात 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा शुभ दिवस येत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते असा अनेकांचा विश्वास आहे.
यामुळे बाजारात अक्षय्य तृतीयेचा दिवशी सोने खरेदीसाठी तुफान गर्दी होते. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अक्षय्य तृतीयेला बंपर डिस्काउंटसह सोने खरेदी करू शकतात.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते विविध डिस्काउंट ऑफर ग्राहकांना देत आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसवर सवलत आणि मोफत सोन्याची नाणी अशा अनेक उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत.चला मग जाणून घेऊया तर आधी उपलब्ध असलेल्या या डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
Senco Gold & Diamonds
Senco Gold & Diamonds आपल्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग शुल्कावर 50 टक्के सूट देत आहे. त्याच वेळी, दागिन्यांचा मेकिंग चार्ज फक्त 8% पासून सुरू होत आहे. जुन्या सोन्याच्या दागिन्यांची नवीन दागिन्यांसाठी देवाणघेवाण करण्यासाठी कोणताही विनिमय दर आकारला जात नाही.
PC Chandra Jewelers
अक्षय तृतीया निमित्त PC Chandra Jewellers ने देखील डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या दागिन्यांवर 15% पर्यंत मेकिंग चार्ज डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दागिन्यांवर 125 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जात आहे. या ऑफर्स 7 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत दिल्या जात आहेत.
Malabar Gold And Diamonds
मलबार गोल्ड आणि डायमंड्स तृतीय ऑफर अंतर्गत अनेकदा सोन्याची नाणी मोफत देत आहेत. यामध्ये ग्राहकांना 30,000 रुपयांवरील सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे मिळेल. त्याचवेळी डायमंड, जेमस्टोन आणि पोल्कीच्या खरेदीवर 250 मिलीग्राम सोन्याचे नाणे उपलब्ध असेल. ही ऑफर फक्त 30 एप्रिलपर्यंत वैध आहे.
Tanishq
टाटाच्या ज्वेलरी ब्रँड तनिष्क आणि त्याच्या सब-ब्रँड Mia च्या सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जवर सूट दिली जात आहे. गोल्ड ज्वेलरी आणि डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवर मेकिंग चार्जेसवर 25% पर्यंत सूट मिळू शकते. 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 पर्यंत ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
हे पण वाचा :- IMD Rainfall Alert: कडक उन्हात मिळणार दिलासा ! ‘या’ राज्यांत पुन्हा पावसाची होणार एन्ट्री ; जाणून घ्या ताजे अपडेट्स