Mumbai Metro Latest Update : मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यास शासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात वेगवेगळ्या मार्गावर मेट्रो सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झाल्यानंतर निश्चितच मुंबईकरांचा प्रवास गतिमान झाला आहे.
मात्र, तरीही काही मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या फेऱ्या या प्रवाशांची संख्या लक्षात घेता खूपच कमी आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महा मेट्रो ने एक मोठा निर्णय घेतला आहे. अंधेरी ते दहिसर पर्यंत सुरू करण्यात आलेली मेट्रो 7 आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत सुरू करण्यात आलेली मेट्रो 2A या मेट्रो मार्गाच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या लोकांना घर बांधण्यासाठी ‘इतकी’ ब्रास वाळू मिळणार फ्री, पहा…..
याबाबत मुंबई महा मेट्रो ने माहिती दिली असून आता वाढीव फेऱ्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महा मेट्रो ने या दोन्ही मार्गावर आठ फेऱ्या वाढवल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर 245 मेट्रोच्या फेऱ्या होत्या मात्र आता या आठ फेऱ्या वाढवल्या असल्याने फेऱ्यांची संख्या 253 इतकी होणार आहे.
त्यामुळे निश्चितच या मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना गारेगार प्रवासाचा अनुभव देणार आहे. यामुळे या मेट्रोच्या निर्णयाचं प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत होत आहे.
हे पण वाचा :- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविरपर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम पूर्ण; ‘या’ दिवशी खुला होणार हा मार्ग, पहा……
महा मेट्रो ने दिलेल्या माहितीनुसार, या संबंधित मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसात मोठी वधारली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या घेणे गरजेचे होते. यानुसार हा निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबई महा मेट्रोच्या या निर्णयानंतर आता 7.29 मिनिटाला मेट्रो या मार्गावर सुरू होणार आहे. आतापर्यंत दर आठ मिनिटाला मेट्रो धावत होती मात्र आता जवळपास साडेसात मिनिटाला एक मेट्रो धावणार आहे.
यामुळे याचा या मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मेट्रो २ ए या मार्गावर दोन स्टेशन्स आहेत आणि मेट्रो मार्ग ७ वर देखील दोन स्टेशन आहेत. या दोन्ही मेट्रो लाइन्समुळं लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी झाली असून आता या मार्गावर वाढीव फेऱ्या मेट्रोच्या राहणार आहेत. परिणामी वाहतूक आणखीनच सुरळीत होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे सातारा, नाशिक, कोल्हापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी