Flipkart Sale : तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एसी-फ्रिज-कूलर आणि फॅन खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल तर हीच चांगली संधी आहे. कारण आता एसी-फ्रिज-कूलर आणि फॅनवर मोठी सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करावे लागतील.
सध्या फ्लिपकार्टवर एक ऑफर लागली आहे. ही ऑफर 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. फ्लिपकार्टने सध्या सुपर कूलिंग डेज सेल सुरु केला आहे. एसी-फ्रिज-कूलर आणि फॅनवर मोठी सूट दिली जात आहे.
जर तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये एसी-फ्रिज-कूलर आणि फॅन या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. त्यामुळे तुमच्या पैशांची मोठी बचत होत आहे. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.
इन्व्हर्टर एसी फक्त 18,999 मध्ये उपलब्ध असेल
फ्लिपकार्टकडून इन्व्हर्टर एसीवर देखील मोठी सूट दिली जात आहे. सुपर कूलिंग डेज सेल अंतर्गत, तुम्ही फक्त 18,999 पासून सुरु होणारे एसी खरेदी करू शकता. सॅमसंग, एलजी, ब्लू स्टार, लॉयड, व्होल्टास आणि डायकिन या कंपनीच्या एसीवर तुम्हाला ऑफर्स दिल्या जात आहेत.
या ब्रँडेड कंपनीच्या एसीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर आणि ईएमआय पर्याय देखील दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील तुम्ही एसी खरेदी करू शकता.
हे 5 स्टार एसी स्वस्तात उपलब्ध आहेत
1. सॅमसंग कन्व्हर्टेबल एसी (सॅमसंग कन्व्हर्टेबल 5-इन-1 कूलिंग 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी)
फ्लिपकार्टकडून सॅमसंग कन्व्हर्टेबल एसीवर मोठी सूट दिली जात आहे. या एसीवर ४१ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा एसी फक्त ४२,५९९ रुपयांना खरेदी करता येत आहे. या एसीमध्ये कॉपर कंडेनसर कॉइल, रिमोट कंट्रोल, 2-वे एअर डायरेक्शन, ऑटो मोड आणि डस्ट फिल्टरसारखी वैशिष्ट्ये मिळत आहेत.
2. LG AI Convertible 6-in-1 कूलिंग 1.5 टन 5 स्टार स्प्लिट AI ड्युअल इन्व्हर्टर AC
फ्लिपकार्टवर LG AI एसी 40 टक्के डिस्काउंटसह 45,490 रुपयांना उपलब्ध आहे., या एसीमध्ये 6-इन-1 परिवर्तनीय कुलिंग, कॉपर कंडेन्सर कॉइल आणि 4 वे स्विंगसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
3. व्हर्लपूल 4-इन-1 Convertible कूलिंग 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
व्हर्लपूल 4-इन-1 Convertible कूलिंग एसीवर फ्लिपकार्टकडून ५० टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे हा एसी ३६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा एसी तुमचे घर काही मिनिटांमध्येच थंडगार करेल.
एसी, फ्रीज, पंखे यांची मागणी वाढली आहे
उंष्णता वाढल्याने पंखे, फ्रिज आणि कुलरची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील फ्लिपकार्टच्या या सेलचा लाभ घेऊ शकता.