Best Summer Destinations : तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यातील पहिल्या महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? तर तुमच्यासाठी भारतातील काही सुंदर ठिकाणे उत्तम ठरू शकतात. भारतात अशी काही सुंदर पर्यटन स्थळे आहेत जी तुमची सहलीचा आनंद द्विगुणित करू शकतात.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण भारतातील विविध ठिकाणच्या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी जात आहेत. तसेच तुम्ही देखील उन्हाळ्याच्या दिवसांत स्टेशनला भेट देऊन थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता.
जुलैमध्ये देखील अनेकांना सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकांना फिरायला जायचे असते. या दिवसांत पावसाला सुरुवात होत असते. त्यामुळे तुमची सहल आनंददायी होऊ शकते.
जुलैमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
राजस्थानचे जैसलमेर
पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही देखील राजस्थानमधील जैसलमेरला भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात वालुकामय वाळवंटाची मजा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जैसलमेरमधील सोनार किल्ला, पटवा की हवेली, गडीसर तलाव, बडा बाग, तनोट माता मंदिर आणि लोद्रावा जैन मंदिराला भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वरला तुम्ही देखील जुलैमध्ये भेट देऊ शकता. पावसामुळे, ढगांनी वेढलेले, सुगंधित सुगंध आणि हलक्या सरींनी येथील दृश्य अधिक हिरवेगार आणि रोमँटिक दिसते.
महाबळेश्वरला भेट देताना तुम्ही वेण्णा तलाव, अनेक वॉटर फॉल्स, विल्सन पॉइंट आणि प्रतापगड किल्ला इत्यादींना भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही देखील उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद घेऊ शकता.
केरळचे मुन्नार
केरळमधील मुन्नारची हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात मुन्नारला जाणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. केरळमधील हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, ज्याला पावसाळ्यात अनेक पर्यटक भेट देतात. मुन्नारमध्ये तुम्ही ट्रेकिंग ट्रेल्स, चहाच्या बागांचा आनंद घेऊ शकता. अलुना आणि एर्नाकुलम रेल्वे स्थानके मुन्नारच्या सर्वात जवळ आहेत.
कर्नाटकातील कुर्ग
तुम्ही पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुम्ही कुर्ग या प्रसिद्ध पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकता. पावसाळ्यात येथील धबधबे तुम्हाला आणखीनच मंत्रमुग्ध करतील. कॉफीचे मळे बघण्यासोबतच ट्रेकिंग, घोडेस्वारीचाही आनंद घेऊ शकता.