DA Hike Update : ‘या’ दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! पगारात होणार पुन्हा एकदा वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

DA Hike Update : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्याबाबत विचार करू शकते. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात झपाट्याने वाढ होऊ शकते.

दरम्यान हा महागाई भत्ता वाढवला जाणार की नाही ते 28 एप्रिलला स्पष्ट होणार आहे. हा महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे हे लक्षात ठेवा. एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जर 18,000 रुपये असल्यास त्याच्या पगारात प्रत्येक महिन्याला 720 रुपयांची वाढ होऊ शकते.

केला अहवाल प्रसिद्ध

अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित करण्यात येतो. जानेवारी ते जूनपर्यंत येणार्‍या आकडेवारीच्या आधारे जुलैमध्ये किती महागाई भत्ता वाढणार हे आता ठरवण्यात येणार आहे. सध्या AICPI ची अंतिम आकडेवारी येणे बाकी असून आतापर्यंत निर्देशांकावरील महागाई भत्ता 43.79 वर गेला आहे. म्हणजेच 44 टक्के महागाई भत्ता फेब्रुवारीपर्यंत हा निश्चित केला आहे. त्यामुळे आता मार्चची आकडेवारी काय सांगते हे पाहावे लागणार आहे. हा मार्च डेटा 28 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत येऊ शकतो.

46 टक्क्यांपर्यंत वाढणार डीए

पूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 34 टक्के इतका होता, त्यानंतर सरकारकडून पहिल्यांदा 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 38 टक्के केला आहे आणि आता पुन्हा एकदा सरकारकडून कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के करण्यात आला आहे.

आता ते जुलैमध्ये 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के इतका होऊ शकतो. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) कडून जारी करण्यात आलेल्या अहवालात महागाई वाढली तर मोदी सरकार जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

इतका वाढणार पगार

जर सरकारने जुलैमध्ये महागाई भत्त्यात पुन्हा 4 टक्के वाढ केली तर पगार पुन्हा वाढू शकतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर त्याच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होऊ शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक 8,280 रुपयांची वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe