Vodafone Idea Offer : Vi ने आणला तगडा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळत आहे शानदार फायदे, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vodafone Idea Offer : जर तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते.

या कंपन्यांचे पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅनही ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. असाच एक रिचार्ज प्लॅन वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीचे हे ३ रिचार्ज प्लॅन आहेत. ज्याची किंमतही खूप कमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात डेटाशिवाय इतर अनेक फायदे मिळत आहेत.

कंपनीचा 368 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा 368 रुपयांचा प्लॅन हा 30 दिवसांची वैधता देत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 60GB डेटा उपलब्ध असून यात तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळत आहे. जे वापरकर्ते Vodafone-Idea दुय्यम सिम म्हणून वापरतात त्यांच्यासाठी हा पॅक एक उत्तम पर्याय आहे.

तसेच या 368 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एसएमएस उपलब्ध असून अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. इतकेच नाही तर कंपनीच्या वापरकर्त्यांना SunNXT अॅप, Binge All Night, V Movies आणि TV चे सबस्क्रिप्शन मिळत आहे.

कंपनीचा 369 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या 369 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 वैधता दिवसांची असून ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज 60GB डेटा म्हणजेच 2GB डेटा मिळेल. तसेच 369 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एसएमएस उपलब्ध असून अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. इतकेच नाही तर कंपनीच्या वापरकर्त्यांना SunNXT अॅप, Binge All Night, V Movies आणि TV चे सबस्क्रिप्शनचा लाभ घेता येणार आहे. याला SonyLIV आणि V Movies आणि TV अॅप्समध्ये प्रवेश मिळतो.

289 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या 289 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4GB डेटा, 600 मेसेज आणि 48 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असून कंपनीचे दुय्यम सिम म्हणून वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा पॅक एक उत्तम पर्याय आहे. 429 रुपयांचा पॅक आहे, ज्यामध्ये 1,000 एसएमएस उपलब्ध असून यात 78 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. तर कंपनीच्या रिचार्जमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे.