MG Motors India : इंधनाच्या किमती वाढत असल्याने ग्राहक आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याला पसंती देत आहेत. अशातच MG मोटर्सने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. कंपनीची लवकरच MG Comet EV ही कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालताना दिसेल.
तसेच लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार इतर कंपन्यांना कडवी टक्कर देऊ शकते. कंपनी यात 230 किमी मायलेजसह भन्नाट फीचर्स देत आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये
कंपनीकडून नवीन MG Comet EV मध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने यात 10.25-इंच हेड युनिट आणि 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह फ्लोटिंग वाइडस्क्रीन सेटअप दिला आहे. तसेच यात व्हॉईस कमांड, इझी कंट्रोल्स, क्रूझ कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर कॅमेरा यांसारखे कूल फीचर्स दिली गेली आहेत.
किती आहे रेंज?
कंपनीच्या या कारमध्ये मजबूत रेंजही देण्यात येत आहे. यात कंपनीकडून 230 किमीची जबरदस्त रेंज देण्यात आली आहे. या कारमध्ये अतिशय स्टायलिश लूकही दिला आहे.
किती असणार किंमत?
या कारच्या किमतीबाबत विचार करायचा झाला तर कंपनीकडून सध्या या कारच्या किमती जाहीर करण्यात आल्या नाहीत. पण असे मानले जात आहे की कंपनी याला जवळपास 10 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करेल. त्यामुळे जर तुम्ही एक जबरदस्त कार घेण्याचा विचार करत असल्यास कंपनीची ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.













