Toyota Fortuner Offer : मार्केटमध्ये सध्या अनेक शानदार मायलेज असणाऱ्या कार लाँच होत आहेत. मागणी आणि फीचर्स शानदार असल्याने या सर्वच कारच्या किमती जास्त आहेत. अशातच कार कंपन्यांनी आपल्या सर्व कारच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.
त्यामुळे ग्राहकांना नवीन कारसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. असे असतानाही तुम्ही आता खूप स्वस्तात टोयोटाची फॉर्च्युनर ही शक्तीशाली कार सहज खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की ऑफर काही दिवसांसाठी असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.
जाणून घ्या ऑफर
माहितीनुसार, 2014 Toyota Fortuner 4×4 MT हे मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत या कारने 1,59,166 किमी अंतर कापले असून ती डिझेल इंजिनवर चालते. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर या कारसाठी 12.40 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.
तसेच या मॉडेलसोबत 2014 टोयोटा फॉर्च्युनर 4×2 मॅन्युअल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत 1.27 लाख किमी कापले आहे. कंपनीची ही कार डिझेल कार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर या कारसाठी 12.62 लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही कार गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
किती आहे कारची किंमत?
कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 32 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 50 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.