Aadhaar Card : तुम्हीही करू शकता ‘या’ तारखेपर्यंत मोफत आधार अपडेट, जाणून घ्या नवीन नियम

Ahmednagarlive24 office
Published:

Aadhaar Card : आधार कार्ड आता प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. तुमचे एकही आर्थिक तसेच इतर काम पूर्ण होऊ शकत नाही. आधार कार्डच्या तपशीलांमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख आणि नंबर यांचा समावेश असतो.

अनेकजण सतत या तपशीलांमध्ये बदल करत असतात. जर तुम्हालाही या तपशीलांमध्ये बदल करायचा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कार्ड धारकांना आता 14 जूनपर्यंत ही कागदपत्र मोफत अपडेट करता येणार आहे.

होणार मोठा फायदा

UIDAI सध्या रहिवाशांना त्यांच्या आधारमध्ये कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची परवानगी देत आहे. UIDAI च्या या निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही आता 15 मार्च ते 14 जून या कालावधीत आधार अपडेट मोफत करू शकता.

आधार नोंदणी आणि अद्यतन नियमन, 2016 नुसार, रहिवासी आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी किमान एकदा ओळखीचा पुरावा (PoI) जमा करावा आणि आधारमध्ये त्यांचे समर्थन दस्तऐवज अपडेट करू शकता.

आधार अपडेटसाठी फॉलो करा या स्टेप्स

  • आधार अपडेटसाठी तुम्हाला सर्वात अगोदर आधारच्या http://uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • यानंतर ‘माय आधार’ पर्यायावर तुम्हाला जावे लागणार आहे.
  • आता Update Your Aadhaar या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुम्हाला आधारमधील पत्ता अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर लॉग इन करून तुम्ही 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुम्ही नोंदणीकृत क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता.
  • त्यानंतर आता अपडेट आधार वर जाऊन प्रोसीड टू आधार वर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुमच्याकडे सध्याचा पत्ता किंवा तुम्ही बदलू इच्छित असणाऱ्या पत्त्याचा पर्याय असणार आहे.
  • या ठिकाणी तुम्हाला नवीन पत्ता भरून तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंटचा पर्याय निवडावा लागणार आहे, ज्यात तुमचा नवीन पत्ता असणार आहे.
  • त्यानंतर आता चेक बॉक्स निवडून नेक्स्ट वर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला 50 रुपये भरून तुम्हाला पावती मिळेल.
  • आता 24 तासांत आधार कार्डमध्ये तुमचा नवीन पत्ता अपडेट करण्यात येईल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe