Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Mutual Fund : गुंतवणूक करत असाल तर चुकूनही करू नका ही चूक, नाहीतर तुम्हीही सापडू शकता मोठ्या संकटात

Mutual Fund : अनेकजण आपल्या सुरक्षित भविष्यसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. याचा त्यांना फायदाही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. यात गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु माहिती नसल्यामुळे अनेक गुंतवणूकदार चुका करतात त्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. जर हा तोटा तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही गुंतवणूक करत असताना काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे. तसेच तुम्ही या चुका केल्या नाही तर तुम्ही मोठा नफा मिळवू शकता.

म्युच्युअल फंडामध्ये करण्यात आलेली गुंतवणूक बँक एफडी आणि पोस्टल योजनांपेक्षा जास्त परतावा देत असते आणि याच कारणामुळे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहे. मात्र सगळ्याच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो असे नाही.

ज्या गुंतवणूकदाराने यात विचार न करता गुंतवणूक केली आहे त्यांना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत नाही. त्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. गुंतवणूकदारांना याबाबत योग्य ती माहिती नसणे हेच याचे कारण आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

मागील कामगिरी पाहणे आवश्यक

कोणताही म्युच्युअल फंड समजून घेण्यासाठी त्या फंडाची मागील २-३ वर्षातील कामगिरी पाहणे आवश्यक आहे. तसेच मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीसाठी आधार असू शकत नाही. यावरून तुम्हाला फंडाची कामगिरी कशी आहे हे समजेल. उदाहरणार्थ, एखादा फंड तीन वर्षांपासून बाजारात आहे आणि त्यात 10,000 रुपये गुंतवण्यात आले आहेत, तर आजच्या काळात 10,000 रुपयांचे मूल्य किती आहे? तसेच त्यावर किती टक्के परतावा मिळाला आहे हे पाहावे लागणार आहे.

खर्चाचे प्रमाण तपासावे

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी खर्चाचे प्रमाण तपासावे. जर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करणार असल्यास खर्चाचे प्रमाण पाहणे खूप गरजेचे आहे. डेट फंडातील खर्चाचे प्रमाण कमी असेल तर त्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे. तसेच कॉर्पसमध्ये वेगाने घसरण एक धोक्याची घंटा आहे.

ब्रँड नावांना महत्त्व देऊ नका

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या ब्रँड नावाच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा निकष असू नये. कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत संशोधन तसेच डेटाचे विश्लेषण करावे. चुकूनही वैयक्तिक शिफारसी, जाहिराती आणि ब्रँड नावांना जास्त महत्त्व देऊ नका आणि गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून गुंतवणूक करा.