Char Dham Yatra Tour Package : 22 एप्रिल रोजी उत्तराखंडच्या चार धाम यात्रेसाठी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जर तुम्हालाही या उन्हाळ्यामध्ये चार धाम यात्रा करायची असेल तर तुम्ही देखील स्वस्तात चार धाम यात्रा करू शकता.
या चार धाम यात्रेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार धाम तीर्थस्थानी तुम्ही देखील IRCTC ची ही टूर पॅकेज बुक करून स्वस्तात यात्रा करू शकता.
उत्तराखंडमधील या चार धाम तीर्थस्थानी दरवर्षीं लाखो भाविक भेट देत असतात. २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले आहेत तर २५ एप्रिल रोजी केदारनाथ आणि २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत.
टूर पॅकेज 1 मे पासून सुरू
या तीर्थस्थानी तुम्हालाही भेट देईची असेल तर IRCTC कडून १ मेपासून टूर पॅकेज सुरु केले जाणार आहेत. ज्यांचे या चार धाम तीर्थस्थानी भेट देण्याचे स्वप्न आहे असे लोक IRCTC चे टूर पॅकेज घेऊन सहज स्वस्तात प्रवास करू शकतात.
IRCTC चे हे पॅकेज 11 दिवस आणि 12 रात्रीसाठी आहे. दुसरीकडे, हे टूर पॅकेज 1 मे पासून दिल्ली, मुंबई, पाटणा, भुवनेश्वर, इंदूर, भोपाळ आणि रायपूर येथे सुरू होणार आहे.
अशा प्रकारे प्रवास नोंदणी करा
जर तुम्हाला चार धाम यात्रेसाठी जायचे आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करणी आवश्यक आहे. कारण या ठिकाणी जाण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
हा नोंदणी करताना तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो टाका. त्यानंतर तुम्ही तुमच्या लॉगिन आयडीसह लॉगिन करून नोंदणी करू शकता. पॅकेजची तारीख आणि इतर माहिती टाकून तुमची नोंदणी पूर्ण करा. यानंतर, तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा आणि तो तुमच्याकडे ठेवा.
21 मे पासून मुंबईहून विमान प्रवासाद्वारे टूर पॅकेज सुरू होणार आहे
तुम्ही मुंबईवरून चार धाम यात्रेचा प्रवास करणार असाल तर IRCTC चे हे टूर पॅकेज विमान प्रवासाद्वारे असेल. जर तुम्ही ३ लोक प्रवास करणार असाल तर प्रति व्यक्ती तुम्हाला 67,000 रुपये द्यावे लागतील.
तसेच एकटे प्रवास करणार असाल तर तुम्हाला 91,400 रुपये द्यावे लागतील. आणि दोन लोक प्रवास करणार असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती ६९,९०० रुपये द्यावे लागतील. मुंबईतील हे टूर पॅकेज २१ मेपासून सुरू होणार आहे.