Hair Care : आपण जशी आपल्या त्वचेची काळजी घेतो तसेच केसांचीही काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रदूषणामुळे केस लवकर खराब होतात. केस खराब झाल्यामुळे कोंडा, खाज सुटणे तसेच केस गळणे यासारख्या मोठ्या समस्या तयार होतात.
त्याशिवाय केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर केसांची अवस्था खूप वाईट होते. अनेक उपाय करूनही ही समस्या दूर होत नाही. जर तुम्हीही या समस्येने हैराण असाल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या केसांची गळती थांबवू शकता.

जाणून घ्या मेथीच्या दाण्यांचे फायदे
मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि लोह असल्याने टाळू मजबूत होते. जर तुम्ही आठवड्यातून 2 दिवस केसांचा मास्क लावला तर केस गळण्याच्या समस्येवर तुम्ही मात करू शकता. याची खासियत म्हणजे हे हेअर मास्क तुम्हाला कोंडा आणि पांढर्या केसांपासूनही वाचवते. तसेच तुमचे केस मजबूत, चमकदार आणि सुंदर दिसतात.
असा तयार करा हेअर मास्क
- जर तुम्हाला हा हेअर मास्क तयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 चमचे मेथीचे दाणे आणि 2 अंडी लागणार आहेत.
- त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवून सकाळी त्याची बारीक करून पेस्ट तयार करा.
- त्यानंतर त्यात 2 अंडी मिसळा, त्यानंतर हेअर मास्क तयार होईल.
लावण्याची पद्धत
- या हेअर मास्कचा पुरेपूर फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला ते योग्य प्रकारे कसे लावायचे हे तुम्हाला समजेल.
- यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर केस पूर्णपणे स्वच्छ करावे लागतील. नंतर हेअर मास्क टाळूवर लावून ते सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा.
- सगळ्यात शेवटी केस स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुम्ही काही दिवस ही प्रक्रिया पुन्हा केली तर तुमचे केस मजबूत होतील तसेच तुम्हाला केसगळतीपासून सुटका मिळेल.