Electric Scooter : भारतात लॉन्च होणार शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर! सिंगल चार्जमध्ये धावणार 120 किलोमीटर, पहा किंमत…

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाल्या आहेत. तसेच बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता आता अनके कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहेत. आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये धमाकेदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे.

मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर देखील वाढवले आहे. आता LML कंपनीकडून देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता ही इलेक्ट्रिक स्कूटर इतर कंपन्यांना टक्कर देऊ शकते.

LML इलेक्ट्रिक स्कूटर जुलै 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे ग्राहकांना बाजारातील इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात मिळत आहे.

LML इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4 kWh ची लिथियम आयन बॅटरी दिली जाऊ शकते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये १२० किमी अंतर कापू शकते. तसेच या स्कूटरमध्ये बसवण्यात आलेली मोटर 6.8PS पॉवर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

तसेच स्कूटरमध्ये धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कस्टमाइझ करण्यायोग्य इंटरएक्टिव्ह डिस्प्ले, 7-इंचाचा TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अॅम्बियंट लाइट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रिव्हर्स मोड, राइड मोड आणि कीलेस एंट्री यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Electric ScooterLML Electric Scooter
Battery Capacity4 kWh
Max Power6.8 PS
Max Torque38 Nm
Riding Range120 km
StartingRemote Start
Drive TypeHub Motor
Wheels TypeAlloy

 

डिझाइन

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्युअल टोन थीम दिसू शकते. याशिवाय एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, एलईडी टेललॅम्प, १२ इंची अलॉय व्हील्स यामध्ये दिसू शकतात.

याच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक अॅब्जॉर्बर दिले जाऊ शकतात. त्याच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिला जाऊ शकतो. बजाज चेतक, TVS iQube आणि Hero Vida V1 शी LML इलेक्ट्रिक स्कूटर टक्कर देऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe