Axis Bank Update : ग्राहकांसाठी गुडन्यूज ! Axis बँकेने FD रेट्स वाढवले, आता तुम्हाला मिळणार एवढा रिटर्न

Published on -

Axis Bank Update : जर तुम्ही Axis बँकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण आता बँकेने ग्राहकांच्या FD रेट्सची वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या एफडी दरामध्ये 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेने केलेल्या या वाढीमुळे ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे.

संबंधित बँकेच्या वेबसाइट प्रमाणे, नवीन रेट हे 21 एप्रिल 2023 या दिवसा पासून लागू झाले आहेत. Axis बँकेच्या ऑनलाइन प्रकारच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्या करिता आपल्याला किमान 5000 रुपये आपल्याला जमा करावे लागतील.

दरम्यान, Axis बँक सुमारे 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत आपल्या बँकेच्या एफडी वर 3.50 टक्के ते 7 टक्के प्रमाणे व्याज देत आहे. ॲक्सिस बँक ही दोन वर्ष ते 30 महिने या मध्ये मॅच्योर होणाऱ्या एफडी साठी सर्वात जास्त म्हणजे 7.20 टक्के व्याजदर देत आहे. तर हीच बँक ज्येष्ठ नागरिकांना या याच मुदतीच्या एफडीवर 7.95 % या दराने व्याज देत आहे.

त्याच बरोबर 7 दिवस ते 45 दिवस या मध्ये मॅच्योर होणाऱ्या एफडी करीता 3.50 टक्के व्याजदर देण्यात येते. तसेच ॲक्सिस बँक 46 दिवस ते 60 दिवस यामध्ये मॅच्योर झालेल्या ठेवींवर सुमारे 4% व्याज देईल.

61 दिवस ते 3 महिन्यांच्या कालावधीत मॅच्योर झालेल्या ठेवींवर 4.50 टक्के व्याजदर बँकेकडून दिला जाईल. आता 3 महिने ते 6 महिन्यांच्या कालावधीचा ठेवींवर 4.75 टक्के व्याजदर दिला जाईल.

AXIS बँक 6 महिने ते 9 महिन्यांत मॅच्योर होणाऱ्या ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देण्याचे आश्वासन दिले आहे. 9 महिने ते 1 वर्ष कालावधी पूर्ण होणाऱ्या ठेवींवर 6% व्याजदर उपलब्ध असेल. अशा प्रकारे तुमच्या ठेवींप्रमाणे तुम्हाला व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe