Jio Recharge Plan Offer : सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. अशातच रिलायन्स जिओही आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते.
या कंपनीचे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. असाच एक प्रीपेड प्लॅन कंपनीने आणला आहे. ज्याची किंमत खूपच कमी आहे. यात तुम्हाला 84 दिवसांसाठी कॉलिंग आणि डेटा फ्री मिळत आहे. कंपनीचा हा सर्वात हिट रिचार्ज प्लॅन आहे.
कंपनीचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जर तुम्हीही 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असल्यास कंपनीचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह एकूण 168GB डेटा ऑफर करण्यात येत आहे.
या ऑफरमध्ये Jio-to-Jio अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असणार आहेत. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. इतकेच नाही तर यात Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही मोफत मिळणार आहे. हा Jio चा खूप सुपरहिट रिचार्ज प्लॅन आहे.
जाणून घ्या फायदे
719 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा आणि एकूण 168GB वापरता येईल. तसेच, या रिचार्ज प्लॅनची दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत खाली येतो. यात JioTV, JioCinema, jio Cloud आणि JioSecurity चे सबस्क्रिप्शन कंपनीने उपलब्ध करून आहे.
जाणून घ्या प्लॅनची किंमत
जर या प्लॅनची किंमत 30 दिवसांसाठी मोजायची झाली तर या प्लॅनचा खर्च 256 रुपये येते. जर या प्लॅनचा रोजचा खर्च बघितला तर तो जवळपास 9 रुपये इतका येतो.हा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांच्या खिशावरही किफायतशीर ठरेल.
कंपनीचा 666 रुपयांचा प्लॅन
Jio च्या या 84 दिवसांच्या वैधतेच्या प्रीपेड प्लॅन अंतर्गत, तुम्हाला दररोज 1.5GB म्हणजेच एकूण 126GB डेटा मिळतो. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड जिओ-टू-जिओ कॉलिंग देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला यात दररोज 100 मोफत एसएमएस दिले जात आहेत.