Vastu Tips : अनेकजण त्यांच्या घरात किंवा कार्यालयात मनी प्लांट लावतात. या प्लांटमुळे त्यांच्या घराचे सौंदर्य तर वाढतेच सोबत ते सहजपणे लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडाला जास्त देखभालीची गरज पडत नाही. हे झाड तुम्ही कोणत्याही बाटली किंवा भांड्यात लावू शकता.
वास्तुनुसार जर तुम्ही घरात हे झाड लावले तर सुख आणि समृद्धी टिकून राहते. तसेच हे मनी प्लांट लावत असताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांटजवळ आणखी एक प्लांट ठेवले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.
मनी प्लांटच्या जवळ ठेवा आणखी एक प्लांट
जर तुम्हीही तुमच्या घरात मनी प्लांट ठेवला असल्यास तर त्याच्या जवळ एक स्पायडर प्लांट ठेवा. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मनी प्लांटसोबत स्पायडर प्लांट ठेवले तर तुम्हाला धनलाभ होईल. सर्वात म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे की हे मनी प्लांट स्पायडर प्लांट घराच्या उत्तर-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावे.
जर तुम्ही या दोन रोपांना या दिशेला ठेवले तर तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि पैसेही येत राहतील. जर तुम्ही ही दोन रोपे एकाच ठिकाणी ठेवली तर, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीतही त्या घरात लोकांची प्रगती होईल.
तसेच हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही या वनस्पतींना चुकूनही कोरडे होऊ देऊ नका, नाहीतर तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मक परिणाम पाहावा लागणार आहे. इतकेच नाही तर चुकूनही ही झाडे पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका, असे करणे तुमच्यासाठी शुभ नसते.