OnePlus 5G : होणार 26500 रुपयांपर्यंतची महाबचत! त्वरित ऑर्डर करा ‘हा’ स्मार्टफोन, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Published on -

OnePlus 5G : वनप्लसचे सर्वच स्मार्टफोन हे ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणीदेखील असते. परंतु या फोनच्या किमती बजेटच्या बाहेर असतात. मात्र आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण तुम्ही आता खूप कमी किमतीत OnePlus Nord 2T 5G हा फोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची 26500 रुपयांपर्यंतची महाबचत होऊ शकते. त्यामुळे त्वरित हा स्मार्टफोन ऑर्डर करा, अशी जबरदस्त संधी तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. कसे ते जाणून घ्या.

या दोन्ही ऑफरसह, या फोनवर उपलब्ध एकूण 26,500 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. हे लक्षात ठेवा की तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात मिळणारी सूट त्याच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. फक्त 1306.56 पासून सुरू होणार्‍या विनाखर्च EMI सह हा फोन तुम्ही खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या या फोनमध्ये तुम्हाला 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे. तसेच या फोनमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच हा फोन Gorilla Glass 5 संरक्षणासह सुसज्ज आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो.

OnePlus चा हा फोन MediaTek Dimension 1300 चिपसेट वर काम करत असून यात फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा तसेच 2-मेगापिक्सेल मोनो लेन्सचा समावेश असणार आहे. वापरकर्त्यांसाठी कंपनीने यात 32 मेगापिक्सेल फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे.

इतकेच नाही तर या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणारा हा फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करतो. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.2, NFC आणि GPS सारखे पर्याय मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe