Upcoming New Cars : भारतात या महिन्यात लॉन्च होणार जबरदस्त कार, पहा किंमत आणि यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming New Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा आता या महिन्यात नवीन जबरदस्त कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. गेल्या महिन्यात देखील अनेक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत.

एप्रिल महिन्यामध्ये मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, एमजी कॉमेट ईव्ही आणि 2023 लेक्सस आरएक्स सारख्या अनेक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच महिन्यात देखील अनेक नवीन कार लॉन्च होणार आहेत.

मारुती सुझुकी कंपनीकडून बहुप्रतिक्षित जिमनी कार लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच टाटा मोटर्सकडून आणखी दोन नवीन कार सीएनजी मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहाकांना आणखी नवीन SUV कारचा पर्याय मिळणार आहे.

मारुती सुझुकी जिमनी

मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो मार्केट गाजवत आहेत. तसेच या कंपनीच्या कार अधिक लोकप्रिय देखील आहेत. तसेच आता कंपनीकडून मारुती सुझुकी जिमनी 5-डोर SUV दोन ट्रिम लेव्हलमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

कंपनीने या दोन मॉडेलची किंमत देखील जास्त ठेवली नसल्याने ग्राहकांच्या बजेटमधील जबरदस्त कार ठरू शकते. या कारचे Zeta आणि Alpha असे दोन मॉडेल लॉन्च केले जाणार आहेत.

Zeta MT मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Alpha AT मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये असेल. मे महिन्याच्या अखेरीस कंपनीकडून ही कार लॉन्च केली जाऊ शकते.

BMW M2

BMW कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. आता BMW कंपनीकडून आणखी एक नवीन कार लॉन्च केली जाणार आहे. M2 (G87) या कारचे नाव असेल. या कारमध्ये M2 मध्ये 3.0-लिटर ट्विन-टर्बो इनलाइन सिक्स इंजिन दिले जाईल जे प्रभावी 460hp आणि 550Nm टॉर्क निर्माण करते. मे महिन्याच्या अखेरीस ही कार लॉन्च केली जाणार आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी

टाटा कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. तसेच आता टाटा कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन सीएनजी कार लॉन्च केली जाणार आहे. टाटा कंपनीने Tata Altroz ​​CNG चे बुकिंग सुरु केले आहे. या महिन्याच्या अखेरीस या कारची डिलिव्हरी सुरु होणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.55 लाख रुपये असू शकते.

BMW X3 M40i

BMW ने आपली मस्त SUV BMW X3 M40i चे बुकिंग सुरु केले आहे. ग्राहक 5 लाख रुपये भरून कंपनीच्या डीलरशिपवर ते बुक करू शकतात. कारमध्ये बोल्ड लुकसह उत्तम लक्झरी फीचर्स मिळतील. कारला क्षैतिज एसी व्हेंट्स आणि 12.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो.

कार फक्त 4.9 सेकंदात 100 Kmph चा वेग पकडते. करचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. त्याची सुरुवातीची किंमत 50 लाख रुपये एक्स-शोरूम असेल असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe