Indian Railways Rules : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो सावधान! रेल्वेचा हा नियम माहिती नसले तर होईल १ वर्षाचा तुरुंगवास

Published on -

Indian Railways Rules : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. तसेच भारताची दळणवळणाची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला ओळखले जाते. मात्र रेल्वे बोर्डाकडून रेल्वेबाबत आणि प्रवाशांबाबत काही नियम जारी केले आहेत. त्या नियमांचे प्रवाशांना काटेकोरोपणे पालन करावे लागते.

रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. तसेच तुम्हाला जेल देखील होऊ शकते. त्यामुळे रेल्वे विभागाचे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या प्रत्येक डब्यांमध्ये अलार्म चेन बसवलेली असते. हे चेन आपत्कालीन परिस्थिती साठी बसवलेली असते. जेव्हा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा ही चेन ओढण्यास परवानगी असते.

मात्र अनेकदा या अलार्म चेनचा गैरवापर केला जातो. त्यामुळे रेल्वे विभागाकडून हे गैरवापर रोखणायसाठी नियम बनवण्यात आला आहे. जर कोणीही आपत्कालीन परिस्थिती नसतानाही चेन ओढल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.

रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये कारवाई केली

जर रेल्वे डब्यांमध्ये बसवलेली अलार्म चेन विनाकारण ओढल्यास प्रवाशांवर रेल्वेचे सुरक्षा दल कारवाई करू शकतात. पूर्व मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोणतेही वैध कारण नसताना चेन पुलिंग करणाऱ्या प्रवाशांविरोधात सात दिवसांची विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वेने २८९ प्रवाशांना ताब्यात घेऊन रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये कारवाई केली.

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार दानापूर विभागातून सर्वाधिक 171 प्रवासी पकडले गेले, तर समस्तीपूर विभागातून 41, पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागातून 35 प्रवासी पकडले गेले. याशिवाय सोनपूर आणि धनबाद विभागातून प्रत्येकी 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विनाकारण चेन ओढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे तसेच रेल्वे गाड्यांना देखील उशीर होत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे विभागाकडून सक्तीचे नियम करण्यात आले आहेत.

चेन पुलिंग केल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो

रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 अन्वये, जर एखाद्या प्रवाशाने कोणत्याही वैध कारणाशिवाय चेन पुलिंग केले तर त्याला 1000 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, या गुन्ह्यासाठी गुन्हेगारास दंड तसेच 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News