Char Dham Yatra : खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा थांबवली, इतके दिवस बंद राहणार यात्रा…

Published on -

Char Dham Yatra : चार धाम यात्रा सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत मात्र उत्तराखंडमधील खराब हवामानाचा परिणाम चार धाम यात्रेवर होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उत्तराखंडमध्ये हवामान खराब होत असल्याने आता उत्तराखंड प्रशासनाकडून केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

२५ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशातील दररोज हजारो भाविक केदारनाथ यात्रेसाठी जात आहेत. पण सततच्या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आता केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी करता येणार नाही.

खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून केदारनाथ यंत्रासाठी ३ मे पर्यंत यात्रेसाठी नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

२२ एप्रिलपासून यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला सुरुवात झाली आहे. तर २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. तसेच २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.

सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 1 मे ते 4 मे पर्यंत हवामान खराब राहील. केदारनाथ धाममध्ये सोमवारीही जोरदार बर्फवृष्टी झाली, त्यामुळे येथे थंडी वाढली आहे.

गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथची नोंदणी सुरू आहे

रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी सांगितले की, केदारनाथमधील खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे यात्रेकरूंची नोंदणी उद्या, ३ मेपर्यंत थांबवण्यात आली आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन नोंदणीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. ऋषिकेश येथील नोंदणी केंद्रात केवळ बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामसाठी नोंदणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

भाविकांना आरोग्याची काळजी घेण्याचे डीजीपींनी केले आव्हान

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी एएनआयला सांगितले की, केदारनाथमधील खराब हवामानामुळे यात्रेकरूंची नोंदणी थांबवण्यात आली आहे. तसेच, हृदय व श्‍वसनाचा त्रास असणा-यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. 11 हजार फूट उंचीवर येण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News