EMotorad Cycle : तुम्हीही इंधनावरील बाईक चालवून त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक कम्पन्यानाची इलेक्ट्रिक बाईक सादर केल्या आहेत. त्या खरेदी करून तुम्ही इंधनावरील बाईकपासून मुक्ती मिळवू शकता. तसेच काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक देखील अगदी स्वस्तात मिळत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांना आर्थिक झळ बसत आहे. हेच लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना स्वस्त दरामध्ये इलेक्ट्रिक वाहने मिळत आहेत.
आता तुम्हाला परवडणाऱ्या बजेटमध्ये स्वस्तात EMotorad सायकल तुम्ही खरेदी करू शकता. या सायकलची किंमत देखील अगदी कमी आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
EMotorad या सायकलमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच लोकनासही या इलेक्ट्रिक सायकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही इलेक्ट्रिक सायकल 3 ते 4 तासात 80 टक्के चार्ज होते.
कमाल वेग २५ किमी प्रतितास
EMotorad या सायकलमध्ये 7.8 Ah बॅटरी बसवण्यात आली आहे. तसेच या सायकलमध्ये 250W ची मोटर देखील जोडण्यात आली आहे. ही मोटार या सायकलला धावण्यासाठी प्रतितास 25 Kmph चा टॉप स्पीड देते.
कंपनीकडून ये इलेक्ट्रिक सायकलची किंमत 27,999 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या ई बाईकमध्ये काढता येण्याजोगी बॅटरी, एलसीडी डिस्प्ले आणि मल्टी लेव्हल पेडल असिस्ट आहे.
जीपीएस आणि जिओ-ट्रॅकिंग वैशिष्ट्य
e Motorad X2 या इलेक्ट्रिक सायकलमध्ये अनेक नवनवीन वैशीष्ट्ये देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये डेटा ट्रॅक करण्यासाठी IoT देण्यात आले आहे. जे आपल्याला लांबचा प्रवास, पर्वत इत्यादींची माहिती देईल. यात जीपीएस आणि जिओ ट्रॅकिंगची सुविधाही आहे. त्यामुळे ही ई बाईक शोधणे खूप सोपे आहे. e Motorad X2 सध्या एकाच प्रकारात येतो.
त्याच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक
या इलेक्ट्रिक सायकलमध्ये सुरक्षेवच्या दृष्टिकोनातून दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. त्यामुळे सहज तुम्ही ही इलेक्ट्रिक सायकल थांबवू शकता. तसेच या सायकलमध्ये पॅडल्सही देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक सायकल तुम्ही पर्वत, खराब रस्ते आणि अरुंद रस्त्यावर आरामात चालवू शकता.