Retirement Planning Scheme : अनेकजण सेवानिवृत्ती नियोजन करत असतात. जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर जर तुमचे नियोजन चुकले तर तुम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो.
तसेच हे लक्षात ठेवा की यात जोखीम पत्कारावी लागू शकते. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये पेन्शन मिळेल. परंतु तुम्हाला त्यासाठी प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीच्या निवडीचा मासिक उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होतो. बाजाराच्या यशावर आधारित, जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर या योजना अधिक चांगला परतावा देत असतात.
परंतु हे प्रोफाईल उच्च जोखीम असून बाजाराने कमी कामगिरी केले तर तुम्हाला पैसे गमावण्याचा धोका असतो.उदाहरणांमध्ये म्युच्युअल फंड, युलिप इ. 50,000 रुपये मासिक पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला अशा योजनांमध्ये 10-12 वर्षांसाठी दरमहा एकूण 9,000 रुपये गुंतवावे लागणार आहे.
जोखीम
तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर, उच्च जोखीम आणि कमी जोखमीच्या संयोजनात गुंतवणूक करणे ही सर्वात उत्तम गुंतवणूक धोरण असू शकते. जर बाजार खराब झाला तर, तुमच्याकडे एक बॅकअप योजना असावी. पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे खूप पर्याय असून जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर.
नॅशनल पेन्शन सिस्टीम
भारत सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीम हा कामगारांना निवृत्त झाल्यानंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेला पेन्शन कार्यक्रम आहे. या सेवानिवृत्ती बचत योजनेचे सदस्य भविष्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या उद्देशाने नियमित बचत करण्यास सक्षम आहेत.
युनिट-लिंक्ड विमा योजना
काही सेवानिवृत्ती ULIPs आहेत जे तुम्हाला गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी उत्पन्नाचे स्रोत प्रदान करत असून याशिवाय या योजनेच्या प्रीमियमचा एक भाग जीवन विमा पॉलिसींसाठी वापरण्यात येतो. उरलेली रक्कम परतावा सुधारण्यासाठी इक्विटी आणि डेट फंडांमध्ये मिसळण्यात येते. ते फंडाच्या बाजारातील कामगिरीवर आधारित स्पर्धात्मक परतावा देत असतात.
म्युच्युअल फंड
हे लक्षात घ्या की गुंतवणुकीचे हे पर्याय इक्विटी किंवा डेट मार्केटमधून फायदे देत असून ते मार्केट लिंक्ड असतात. गुंतवणुकीची जोखीम पूर्णपणे गुंतवणूकदाराने गृहीत धरली असून जोखीम प्रोफाइल संतुलित करण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना वापरण्याचा सल्ला देण्यात येतो.