Cricket Match : बाबो .. अवघ्या 9 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट , 4 चेंडूत संपला सामना , वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Cricket Match : तुम्ही आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होताना आणि मोडताना पाहिले असेल. क्रिकेटच्या सामन्यात कधी फलंदाज वर्चस्व गाजवतात तर कधी गोलंदाज चेंडूने कहर करतात.

यामुळे दररोज अनेक विक्रम होतात आणि मोडले देखील जातात. मात्र तुम्ही कधी हे ऐकले आहे एका आंतरराष्ट्रीय सामन्यात संपूर्ण संघ फक्त 9 धावांवर ऑलआऊट झाला ? नाहीना मात्र हे घडलं आहे.

9 धावांवर संघ ऑलआऊट

हा आंतरराष्ट्रीय सामना थायलंड आणि फिलीपिन्सच्या महिला संघामध्ये खेळला गेला होता. T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फिलिपाईन्सचा संघ अवघ्या 9 धावांत गारद झाला.

संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. चार फलंदाजांनी 2-2 धावा केल्या त्यानंतर एक धाव अतिरिक्त आली. थायलंडसाठी थिपाचा पुथावोंगने चार गडी बाद केले तर ओनिका कामचोम्फूने तीन बळी घेतले.

4 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला

थायलंडच्या संघाने फिलिपाइन्सकडून दिलेले 10 धावांचे लक्ष्य अवघ्या चार चेंडूत पूर्ण केले. कर्णधार नानापत कोंचरोनेकाई आणि नत्थाकन चँथम यांनी थायलंडकडून डावाची सुरुवात केली. अॅलेक्स स्मिथच्या पहिल्याच षटकात दोघांनी एकत्र येऊन सामना संपवला. नानापतने 2 चेंडूंचा सामना करत 3 धावा केल्या तर नत्थकनने एका चौकारासह 6 धावा केल्या.

मालदीवच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम मालदीव संघाच्या नावावर आहे. मालदीवचा संघ एकदा बांगलादेशविरुद्ध तर एकदा रवांडाविरुद्ध 6 धावांत गुंडाळला आहे.

त्याचवेळी नेपाळविरुद्ध खेळताना मालदीवचा संपूर्ण संघ अवघ्या 8 धावांत गारद झाला. आता या लाजिरवाण्या यादीत फिलिपाइन्सचेही नाव जोडले गेले आहे.

हे पण वाचा :-  PAN Card : भारीच .. आता अवघ्या 10 दिवसांत बनवता येणार पॅन कार्ड ! घरबसल्या असा करा ऑनलाइन अर्ज 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe