Kitchen Tips & Hacks : आजकाल अनेकजण घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये छोटी छोटी झाडे लावत असतात. या झाडांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता अनेकजण सेंद्रिय खतांचा वापर करतात. झाडांना सेंद्रिय खाते देण्यासाठी अंड्याचे कवच, कोकोपीट इत्त्यांदीचा वापर केला जातो.
पण तुम्हीही घरामध्ये झाडे लावली असतील तर घरगुती पद्धतीने बनवलेल्या सेंद्रिय खताचा वापर करू शकता. चहा बनवल्यानंतर अनेकजण उरलेली चहाची पाने फेकून देतात. पण ही चहाची पाने फेकून न देता तुम्ही त्यापासून घरबसल्या खत तयार करू शकता.
चहा बनवल्यानंतर उरलेली चहाची पाने किती उपयुक्त आहेत?
चहा बनवल्यानंतर उरलेल्या चहाच्या पानापासून तुम्ही कंपोस्ट खत तयार करू शकता. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, नायट्रोजन, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक प्रामुख्याने आढळतात. या घटकांमुळे तुमची झाडे देखील चांगली बहरतात.
चहा बनवल्यानंतर उरलेल्या चहाच्या पानांपासून कंपोस्ट कसे बनवायचे?
चहा बनवल्यानंतर उरलेल्या चहाची पाने फेकून देतात. मात्र ती फेकून न देता तुम्ही त्यापासून खते तयार करू शकता. चहा बनवल्यानंतर उरलेली पाने तुम्ही मातीमध्ये मिसळून खत तयार करू शकता. हे करत असताना सर्वात प्रथम उरलेली चहाची पाने व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतरच ती मातीमध्ये मिसळा.
चहाची पाने धुवून वाळवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही चहाच्या पानांपासून खत तयार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ती सामान्य पाण्यामधून दोन वेळ धुवून काढणे गरजेचे आहे. त्यांनतर ही पाने दोन ते तीन महिने मातीत मिसळून ठेवा.
चहाच्या पानापासून बनवलेले कंपोस्ट घरच्या घरी कसे वापरावे?
जर तुम्हाला चाचा उरलेल्या पानांपासून खत तयार करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला झाडाच्या भोवती ही पाने मातीत मिसळावी लागतील. हळूहळू या पानांपासून खत तयार होते आणि झाडाची गुणवत्ता सुधारते.
चहाच्या पानांचे कंपोस्ट कोणत्या झाडांवर वापरले जाऊ शकते?
मोगरा, गुलाबासारख्या फुलांच्या रोपांसाठी चहाच्या पानांचे कंपोस्ट खत बनवता येते, तसेच टोमॅटो, वांगी यांसारख्या भाजीपाला वनस्पतींसाठीही वापरता येते. त्यामुळे उरलेली चहाची पाने तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
चहाच्या पानांचे कंपोस्ट कोणत्या झाडांवर वापरू नये?
मुळा, गाजर, बटाटा यांसारख्या वनस्पतींवर याचा वापर करू नये. कारण या झाडांना लागणारे नायट्रोजनचे प्रमाण खूपच कमी असते. आणि चहाच्या पानात नायट्रोजनचे प्रमाण खूप जास्त असते.
चहाच्या पानांचे कंपोस्ट झाडांवर टाकण्याचे इतर कोणते फायदे आहेत?
चहाच्या पानांचे कंपोस्ट हे सेंद्रिय असते, ज्यामध्ये टॅनिन नावाचे ऍसिड आढळते ज्यामुळे झाडांना रोगांशी लढण्याची क्षमता मिळते. याशिवाय चहाच्या पानातील कंपोस्ट मातीचा पीएच अम्लीय ठेवते.
त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्याच वेळी जमिनीची रचनाही सुधारते. चहाच्या पानांचे कंपोस्ट खत बनवण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. हे विनामूल्य केले जाऊ शकते.